Video: महादेवाचा नंदी दूध पितो, औरंगाबादेत अफवेने उसळली गर्दी; पोलिसांची धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 10:19 PM2022-03-05T22:19:20+5:302022-03-05T22:20:25+5:30

या सुखद घटनेचा महिलांना मोठा आनंद झाल्याचे काही महिलांच्या तोंडातून ऐकावयास मिळाले. परंतु शेवटपर्यंत ही अफवाच असल्याचे बोलले जात आहे.

Video: Mahadev's Nandi drinks milk, crowd rushes in Aurangabad, police run | Video: महादेवाचा नंदी दूध पितो, औरंगाबादेत अफवेने उसळली गर्दी; पोलिसांची धाव

Video: महादेवाचा नंदी दूध पितो, औरंगाबादेत अफवेने उसळली गर्दी; पोलिसांची धाव

googlenewsNext

औरंगाबाद/सोयगाव - महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दूध पित असल्याची वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात व ग्रामीण भागात पसरताच अचानक सायंकाळी ग्रामीण भागातील महादेवाच्या मंदिरावर महिलांची मोठी गर्दी उसळली. या गर्दीला आवर घालण्यासाठी अखेरीस सोयगाव पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले. मात्र, अखेर ही अफवा असल्याचे समोर आले आहे. परंतु प्रत्यक्षदर्शी काही महिलांशी वार्तालाप केला असता अफवा पसरण्याच्या आधी दहा मिनिटे आधीच काही महिलांकडून नंदीने दुध वर्ज केल्याचे महिलांनी सांगितले. 

या सुखद घटनेचा महिलांना मोठा आनंद झाल्याचे काही महिलांच्या तोंडातून ऐकावयास मिळाले. परंतु शेवटपर्यंत ही अफवाच असल्याचे बोलले जात आहे. सोयगाव तालुक्यात महादेवाच्या मंदिरावर नंदी दुधाचे आणि पाण्याचे सेवन करतोय, अशी चक्क अफवा तालुकाभर पसरली होती. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील सर्वच महादेवाच्या मंदिरावर रात्री उशिरापर्यंत महिलांची गर्दी उसळल्याचे पहावयास मिळाले. मात्र, ही अफवा असल्याचे आणि काही महिलांना नंदीने दुध सेवन केल्याच्या आनंदाने त्यांना स्वर्ग दोन बोटे राहिला होता. आमखेडा आणि सोयगाव शहर भागात ऐनवेळी पोलीस बंदोबस्त मंदिर परिसरात तैनात करावा लागला होता. वार्ता वाऱ्यासारखी पसरताच महिलांनी दुध, पाणी घेवून मंदिर परिसर गाठला व महिलांच्या हाताने नंदीच्या मूर्तीला दुध आणि पाणी देण्यात आले. त्यातही काही महिलांनी श्रद्धेपोटी महादेवाच्या नंदीला दुध आणि पाणी वर्ज केले त्यात काहींनी तर आमच्या हाताने नंदीने दुध पिल्याचे सांगितल्याने आणखीनच भर पडली होती.

अध्यात्मात श्रद्धेला मोल नाही

असे म्हणतात की, अध्यात्मात श्रद्धेला मोल नाही. त्यामुळे अनेक महिलांनी श्रद्धेपोटी महादेवाच्या नंदीने दुध पिल्याचे सांगितले. तर दुसरीकडे यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असू शकते, असेही काहींचे म्हणणे झाल्याने रात्रभर सोयगाव तालुक्यात या चर्चेला उधाण आले आहे. 

लाखो लिटर दुध महादेवाच्या पिंडीवर

महादेवाचा नंदी दुधसेवन करतो या अफवेने सोयगाव तालुक्यातील महादेवाच्या मंदिरावर लाखो लिटर दूध सोडण्यात आले होते. त्यामुळे हे चित्र पाहून, अचानक झालेल्या दुध दर वाढीचे आंदोलन तर नाही ना, असेही काहींना वाटले होते.

सोयगाव आणि आमखेडा परिसरातील महादेवाच्या मंदिरावर अचानक महिलांची गर्दी झाल्याचे कळल्यावर मोठा बंदोबस्त घेवून मंदिर परिसरात गेलो तर त्या ठिकाणी महादेव मंदिरावरील नंदी दुध पीत असल्याची बातमी ऐकण्यात आली होती परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
                  
सुदाम शिरसाठ
पोलीस निरीक्षक सोयगाव

Web Title: Video: Mahadev's Nandi drinks milk, crowd rushes in Aurangabad, police run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.