Video: वृद्ध महिलेचे पत्र्याचे शेड तोडल्याने संतप्त जमावाने महापालिकेचा जेसीबी जाळला

By विकास राऊत | Updated: October 26, 2023 16:47 IST2023-10-26T16:47:11+5:302023-10-26T16:47:44+5:30

महिला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास गेली असून गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती आहे.

Video: JCB of municipal corporation burnt by angry mob after breaking old woman's tin shed | Video: वृद्ध महिलेचे पत्र्याचे शेड तोडल्याने संतप्त जमावाने महापालिकेचा जेसीबी जाळला

Video: वृद्ध महिलेचे पत्र्याचे शेड तोडल्याने संतप्त जमावाने महापालिकेचा जेसीबी जाळला

छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे एकटी राहत असलेला वृद्ध महिलेचे पत्र्याचे शेड महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने आज सकाळी तोडले. यामुळे संतप्त जमावाने महापालिकेचा जेसीबी जाळून टाकला. 

राजनगर भागात वृध्द महिला एकटी होती. येथे पाच हजार फूट जागेत त्या महिलेने पत्र्याचे शेड उभारले होते.मनपाने हे शेड भुईसपाट केले. हे  पाहून वृद्धेने एकच हंबरडा फोडला. सदरील महिलेच्या मदतीची याचना अनेकांनी केली. मात्र कोणीच ऐकत नसल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी जेसीबी पेटविला. दरम्यान, महिला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास गेली असून गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती आहे.

Web Title: Video: JCB of municipal corporation burnt by angry mob after breaking old woman's tin shed