शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कनेरगाव रस्त्यामुळे वाहनधारक धास्तावले

By admin | Updated: May 22, 2014 00:34 IST

मदन बियाणी, कनेरगाव नाका हिंगोली - कनेरगाव नाका या रस्त्याची झालेल्या दुरवस्थेकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले

मदन बियाणी, कनेरगाव नाका हिंगोली - कनेरगाव नाका या रस्त्याची झालेल्या दुरवस्थेकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले असून लोकप्रतिनिधीही याकडे पाहत नसल्याने त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून वाहने घेऊन जाताना करावी लागणारी कसरत पाहून वाहनधारक चांगलेच धास्तावले आहेत. वाशिम - हिंगोली या रस्त्याचे २८ आॅगस्ट २००९ पासून काम सुरू करण्यात आले होते. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मिळालेल्या ४ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीतून हा रस्ता यवतमाळ येथील कंत्राटदाराने केला होता. या रस्त्याचे काम २० मे २०११ रोजी पूर्ण झाले. त्यानंतर ३ वर्षे या रस्त्याच्या दुरूस्तीची जबाबदार संबंधित कंत्राटदारावर होती; परंतु रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याअधीच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे संबंधित कंत्राटदाराने पूर्णत: दुर्लक्ष केले. आता तर या रस्त्यावर वाहने चालविणेच अत्यंत अवघड झाले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडलेले दिसून येत असून काही ठिकाणी तर १ ते २ फुट खोल खड्डे पडलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. अशा रस्त्यावर वाहने चालविने फार अवघड झाले आहे. कनेरगाव पुढील फाळेगाव पाटीजवळ तसेच फाळेगाव पाटी समोर आंबाळा, आडगाव पुलाजवळ मोठ-मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत. तर वडद पाटी, चिंचाळा पंपाजवळ रस्ता उखडून गेला आहे. त्या पुढे माळहिवरा पाटी समोर रस्त्याची दुरवस्था झाली असून कलगाव उतारात तसेच चढाईवर सुद्धा रस्ता खराब झाला आहे. पारोळा पाटी ते डेन्टल कॉलेज दरम्यान खड्डे पडलेले आहेत. वाहनधारकांना कोणता खड्डा चुकवावा असा प्रश्न पडत आहे. खड्ड्यामध्ये दुचाकी, चार चाकी वाहनांचे नुकसान होत आहे. या राज्य रस्त्यावरील अनेक वाहनधारकांशी सदर प्रतिनिधीनी चर्चा केली असता वाहन धारकांकडून चिंजाजनक प्रतिक्रिया मिळाली. त्यामध्ये कैलास तुकाराम जाधव (रा. जोडतळा), संतोष प्रजापती (मध्य प्रदेश), ओम तनपुरे, सोनू भारुका यांनी सांगितले की, या रस्त्याने वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता पावसाळ्यापुर्वी दुरूस्ती करण्यात यावा, नसता पाऊस पडल्यानंतर रस्त्याची मोठी बिकट अवस्था होईल, असेही ते म्हणाले.