शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला कडाडला..!

By admin | Updated: April 18, 2016 00:51 IST

जालना : जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जलसाठे मार्च महिन्यातच कोरडेठाक पडले होते. परिणामी भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम झाला.

जालना : जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जलसाठे मार्च महिन्यातच कोरडेठाक पडले होते. परिणामी भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम झाला. उत्पादनात घट झाल्याने बाजारात आवक मंदावली असून, भावही कडाडले आहेत. भाज्यांच्या दारात पाच ते सात रूपयांनी वाढ झाली आहे. जालना शहरात रविवारचा भाजीपाला बाजार भरतो.या बाजारात भाजीपाल्याची आवक गत पंधरवड्यापेक्षा अर्ध्याने कमी झाल्याचे चित्र दिसून आले. फळ तसेच पालेभाज्यांच्या भावात चांगलीच वाढ झाली होती.आठवडी बाजार भरत असल्याने अनेक नागरिक आठवडाभराचा भाजीपाला येथून खरेदी करतात. भावही बऱ्यापैकी असल्याने या बाजारातील गर्दी काही महिन्यांपासून वाढत आहे. १७ एप्रिल रोजी झालेल्या बाजारात भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले होते. यात गवार ६० रूपये किलो, वांगे ३० रूपये किलो, सिमला मिरची ५० रूपये किलो, शेवगा शेंगा ४० रूपये किलो दराने विक्री झाली. बटाटे १५ ते ३० रूपये किलो, कांदा १० ते ३० रूपये किलोचे भाव आहेत. पाण्याची स्थिती बिकट असल्याने भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत असल्याचे वाघ्रूळ येथील विक्रेते खरात यांनी सांगितले.मे महिन्यात परिस्थिती आणखी बिघडेल अशी भीती व्यक्त केली. काही उत्पादक टँकरद्वारे पाणीपुरवठा देऊन उत्पादन घेत आहेत. पुढील महिन्यात टँकर कमी पडतील असा अंदाज खरात यांनी व्यक्त केला. जालना तालुक्यातील वाघ्रूळ, नंदापूर, जामवाडी, माळशेंद्रा इंदेवाडी, अंतरवाला, गोलापांगरी परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते.या रविवारी वरील गावातून भाजीपाल्याची आवक कमालीची मंदावल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. पालक, मेथी, कोंथबीरेच भावही चांगलेच वधारले आहेत. कोथंबीरची जुडी दोन ते पाच रूपये, मेथी व पालक दहा रूपयांना तीन जुड्या मिळत होत्या. टोमॅटोचे भावह वीस रूपये प्रति किलोेंवर गेले आहेत.