वैद्यनाथ मंदिर सुरक्षेचा एटीएसने घेतला आढावा

By Admin | Updated: August 23, 2014 00:53 IST2014-08-23T00:52:41+5:302014-08-23T00:53:15+5:30

परळी : देशातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराची एटीएसच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाणी करत सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी परळी पोलिसांना सूचना दिल्या.

Vaishnath temple security review taken by ATS | वैद्यनाथ मंदिर सुरक्षेचा एटीएसने घेतला आढावा

वैद्यनाथ मंदिर सुरक्षेचा एटीएसने घेतला आढावा

परळी : देशातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिराची एटीएसच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाणी करत सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी परळी पोलिसांना सूचना दिल्या.
सुरक्षेची चाचपणी करण्यासाठी पथकाने दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाकडे एक पिस्तुल दिले. सुरक्षा व्यवस्थेतील यंत्रणा सतर्क असल्याने ते सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले. श्रावण महिना सुरु असल्याने एटीएस अधिकाऱ्यांनी मंदिर सुरक्षितता व सुरक्षा रक्षकांची पहाणी केली. या काळात कोणातही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. त्यामुळे एटीएस अधिकाऱ्यांनी मंदिर सुरक्षतेचा आढावा घेतला. यावेळी दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना सुरक्षेच्या दृष्टीने सूचना दिल्या़ मंदिर प्रशासन पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती़
दरम्यान, परळीचे पो़ नि़ धरमसिंग चव्हाण म्हणाले की, वैद्यनाथ मंदिरातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात येईल. सुरेक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना पूर्वीच केल्या आहेत़ त्यात आणखी सुधारणा करण्याचे प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले़ (वार्ताहर)

Web Title: Vaishnath temple security review taken by ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.