शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरच्या मातीतच घडला ‘IFS’ अधिकारी; प्रतीक कुशारेची 'सेल्फ स्टडी'च्या जोरावर बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:56 IST

"निकाल पाहताना हात थरथरला, पण डोळ्यांत आनंदाश्रू तरळले!" ४ वेळा अपयश आले, पण आईच्या विश्वासाने इतिहास घडवला

छत्रपती संभाजीनगर : युपीएससीचा निकाल जाहीर होतो...अनेकदा अपयशाची यादी पाहण्याची सवय झालेल्या डोळ्यांमध्ये यावेळी एक वेगळीच धाकधूक असते. यावेळी तरी आपलं नाव असेल का, हा विचार मनात काहूर माजवतो. पण गुणवत्ता यादीत ‘प्रतीक चंद्रशेखर कुशारे, ऑल इंडिया रँक १००’ हे नाव झळकले, तेव्हा पाच वर्षांचा थकवा, ताणतणाव आणि अपयशाच्या सर्व खुणा एका क्षणात पुसून आनंदाश्रू तरळले. ही कहाणी आहे छत्रपती संभाजीनगरच्या एका जिद्दी तरुणाची, ज्याने दिल्ली-पुण्याची वाट न धरता, शहरात राहून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘भारतीय वन सेवेत’ देदीप्यमान यश मिळविले.

प्रतीकने २०१३ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर शासकीय तंत्रनिकेतन येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजमधून २०१९ मध्ये बी.ई.ची पदवी घेतली. पदवी हातात आल्यावर त्याने कॉर्पोरेट नोकरीच्या मागे न धावता देशसेवेचे आणि प्रशासनात जाण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगले व २०२० पासून पूर्णवेळ युपीएससीची तयारी सुरू केली.

आई ढाल बनून उभी
स्पर्धा परीक्षेचा रस्ता कधीच सोपा नसतो. कधी पूर्वपरीक्षेत तर कधी मुख्य परीक्षेत अपयश पदरी पडले. सलग चार प्रयत्नांत अपयश आल्यावर कोणताही सामान्य तरुण खचून गेला असता. अपयशाच्या मालिकेने निराश झालेल्या प्रतीकच्या मनातही अनेकदा विचार आला, आता बस..मी थांबवतो आणि दुसरी एखादी नोकरी किंवा करिअरचा मार्ग निवडतो. पण या अंधारात एक आशेचा किरण होता त्याची आई. शिक्षिका असलेल्या आईने आणि शेती करणाऱ्या वडिलांनी त्याला खंबीर साथ दिली. आईच्या ठाम विश्वासावर तो पुन्हा उभा राहिला अन् यश खेचून आणले.

सलग पाच वर्ष सेल्फ स्टडी
स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांची पहिली पसंती दिल्ली किंवा पुण्याला असते. पण प्रतीकने हा समज खोटा ठरवला. सलग ५ वर्षे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या घरी राहूनच ‘सेल्फ स्टडी’ केली. रोज ८ तास तो अभ्यास करत असे. योग्य नियोजन, स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास आणि अफाट चिकाटी या जोरावर त्याने मर्यादित साधनसामग्रीत हे यश मिळविले. भारतीय वनसेवेच्या माध्यमातून जंगल वाढ, जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची त्याची इच्छा आहे.

अपयश आले तरी थांबू नका
यश एका दिवसात मिळत नाही. सातत्य, संयम आणि स्वतःवर असलेला विश्वास हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. अपयश आले तरी थांबू नका. प्रयत्न सुरूच ठेवा.
-प्रतीक कुशारे

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar's Pratik Kushare cracks IFS with self-study, determination.

Web Summary : Pratik Kushare from Chhatrapati Sambhajinagar achieved remarkable success in the Indian Forest Service (IFS) exam through self-study. Overcoming multiple failures, he persevered with unwavering support from his parents. His success underscores the power of self-belief and consistent effort, proving Delhi coaching isn't essential.
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर