शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनपुऱ्यात अपक्षांचा वरचष्मा

By admin | Updated: January 9, 2015 00:52 IST

औरंगाबाद : छावणीतील पेन्शनपुरा वॉर्डात यावेळी तब्बल ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे येथे खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत बघायला मिळत आहे.

औरंगाबाद : छावणीतील पेन्शनपुरा वॉर्डात यावेळी तब्बल ९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे येथे खऱ्या अर्थाने प्रचाराची रंगत बघायला मिळत आहे. सेना, भाजपाचा प्रभाव कमी असल्यामुळे वॉर्डात अपक्षांचाच वरचष्मा दिसून येत आहे. मागील वेळी अपक्ष उमेदवार शेख हनिफ हे या वॉर्डातून निवडून आले होते. यावेळी पुन्हा ते मैदानात आहेत. भाजपाने त्यांच्या विरोधात नंदकिशोर साकल यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून जीवन यादव हे मैदानात आहेत. गेल्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार राहिलेले सायना दारेल्लू हे यावेळी अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत. तसेच लक्ष्मीनारायण श्रीगुरू, मोहम्मद नसीम, मोहम्मद अखिल, शेख खलील, युनूस खान हे पाच जण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे. मुस्लिमबहुल असलेल्या या वॉर्डात शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांचा प्रभाव तुलनेने कमी आहे. त्यामुळे येथे अपक्ष उमेदवारांचीच चर्चा अधिक आहे. त्यातही विद्यमान नगरसेवक हनिफ शेख आणि मोहम्मद नसीम या दोघांमध्ये प्रमुख लढत होईल, असे दिसते. पेन्शनपुरा वॉर्डात एकूण १७१० मतदार आहेत. पेन्शनपुरा वॉर्डाचा अलीकडच्या काही वर्षांतील इतिहास पाहता येथे कोणत्याही नगरसेवकाला मतदारांनी सलग दुसऱ्यांदा संधी दिलेली नाही. मात्र, यावेळी हे रेकॉर्ड आपण ब्रेक करू, असा दावा नगरसेवक शेख हनिफ करीत आहेत. दुसरीकडे सेना, भाजपा आणि इतर अपक्ष उमेदवार हे शेख हनिफ यांनी वॉर्डात विकासकामे केली नसल्याचे सांगून मतदारांकडे मते मागत आहेत. सेनेचे सायना दारेल्लू हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे सेनेच्या अधिकृत उमेदवाराला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. छावणीत सध्या सातपैकी तीन वॉर्डात उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यामध्ये पेन्शनपुरा वॉर्डाचाही समावेश आहे. सहा आणि दोन क्रमांकाच्या वॉर्डात प्रत्येकी दहा उमेदवार रिंगणात आहेत. तर पेन्शनपुरा वॉर्डात ही संख्या ९ आहे. प्रचारासाठी एकच दिवस राहिल्याने सर्व उमेदवार जोरदार प्रचार करीत आहेत. सकाळ, संध्याकाळ पदयात्रा काढण्यात येणार आहेत.