छत्रपती संभाजीनगरात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाच्या सरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:30 IST2026-03-20T15:25:31+5:302026-03-20T15:30:03+5:30

सुरुवातीला हलक्या, मध्यम स्वरूपाचा व नंतर जोरदार पाऊस बरसला.

Unseasonal rains continue in Chhatrapati Sambhajinagar for the second day | छत्रपती संभाजीनगरात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाच्या सरी

छत्रपती संभाजीनगरात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाच्या सरी

छत्रपती संभाजीनगर : शहर व परिसरात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास वादळवाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाल्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशीदेखील रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. शहरातील अनेक भागांत पावसामुळे वीज गेली होती. सुरुवातीला हलक्या, मध्यम स्वरूपाचा व नंतर जोरदार पाऊस बरसला.

पिसादेवी, हर्सूल परिसरात ८:३० वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर तासाभराने शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. शहरातील बहुतांश सर्व भागात पाऊस सुरू होता. चार दिवसांपासून कमाल तापमान घसरत असून, हवामान खात्याने २२ मार्चपर्यंत गारपिटीसह पाऊस हाेईल, असा इशारा दिला आहे. गुरुवारी दिवसभरात शहर व परिसरात कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

Web Title : छत्रपति संभाजीनगर में लगातार दूसरे दिन बेमौसम बारिश

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में गरज के साथ लगातार दूसरे दिन बेमौसम बारिश हुई। शहर के कई हिस्सों में बिजली गुल रही। मौसम विभाग ने 22 मार्च तक ओलावृष्टि और बारिश की चेतावनी जारी की है। अधिकतम तापमान 34.3 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया।

Web Title : Unseasonal Rains Lash Chhatrapati Sambhajinagar for Second Consecutive Day

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar experienced another day of unseasonal rain with thunderstorms. Power outages occurred in several parts of the city. The weather department has issued a warning for hailstorms and rain until March 22nd. The maximum temperature recorded was 34.3 degrees Celsius.