लहरी निसर्ग! जूनमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत चारच दिवस पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:15 IST2025-06-17T13:11:09+5:302025-06-17T13:15:01+5:30

लहरी निसर्गाचा पेरण्यावर मोठा परिणाम; मे महिन्यात सरासरी १५ दिवस पाऊस

Unpredictable nature! Only four days of rain have fallen in Chhatrapati Sambhajinagar district so far in June. | लहरी निसर्ग! जूनमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत चारच दिवस पाऊस

लहरी निसर्ग! जूनमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत चारच दिवस पाऊस

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात जून महिन्यातील पूर्वार्धातील १५ पैकी चार दिवस पावसाने हजेरी लावली. ११ दिवस कोरडे गेले आहेत. याचा परिणाम पेरण्यांवर होतो आहे.

जूनच्या तुलनेत मे महिन्यात मात्र अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीच पाणी केले. ३१ पैकी सरासरी १५ दिवस पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. १४ मि.मी. पाऊस मे महिन्यात होणे अपेक्षित असताना १५० मि.मी. पाऊस झाला. १०८३ टक्के इतका हा पाऊस असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मागील वर्षी म्हणजेच १५ जून २०२४ पर्यंत ११९ मि.मी. पावसाची नोंद जिल्ह्यात झाली होती. यंदा ११.३ मि.मी.पाऊस १५ जूनपर्यंत झाला आहे. ९० टक्के पावसाची तूट आहे. ५८१.७ मि.मी. जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान आहे.

दरम्यान, रविवारी शहर व परिसरात ४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. कमाल तापमान ३२.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.१ अंश सेल्सिअस होते. हवेतील आर्द्रता ९५ टक्के होती.
मे महिन्यात सुमारे १५ दिवस पाऊस बरसला. जिल्ह्यात १५० मि.मी. पावसाची नोंद झाली. साधारणत: १५ मि.मी. पाऊस जिल्ह्यात अपेक्षित असतो. मे महिन्यातील अवकाळी पावसानंतर जून महिन्यात नियमित पावसाळा लागूनही पाऊस होत नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर परिणाम झाला आहे.

१५ जूनपर्यंत पावसाचे दिवस...
१५ जून : ४.४ मि.मी.
१३ जून : ५.८ मि.मी.
१२ जून : १८ मि.मी.
५ जून : ३.७ मि.मी.

Web Title: Unpredictable nature! Only four days of rain have fallen in Chhatrapati Sambhajinagar district so far in June.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.