सिल्लोडजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:24 IST2025-06-27T16:23:52+5:302025-06-27T16:24:40+5:30

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनातील काही प्रवाशांनी अपघाताचे रिलसाठी व्हीडिओ काढले; परंतु अपघातग्रस्तांना कोणीही मदत केली नाही.

Unknown vehicle hits two-wheeler near Sillod; one dies on the spot, two seriously injured | सिल्लोडजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

सिल्लोडजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

सिल्लोड / भराडी : भराडी ते कासोद रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. सुनील बबन साळवे (वय ३०, रा. तळणी ता. सिल्लोड) असे या घटनेतील मयताचे नाव असून गोपाल इंदलसिंग सिंघल (३२) व संदीप शिवाजी साळवे (३० वर्षे, दोघेही रा. तळणी) अशी जखमींची नावे आहेत.

तळणी येथील सुनील बबन साळवे हे आपल्या दोन मित्रांसमवेत भराडीहून कासोद रस्त्याने गावाकडे दुचाकीवर जात असताना येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर हे वाहन पसार झाले. या अपघातात सुनील बबन साळवे याचा जागीच मृत्यू झाला तर गोपाल इंदलसिंग सिंघल व संदीप शिवाजी साळवे हे दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच तळणी येथील सरपंच प्रभाकर वाघ यांनी अपघातग्रस्त तिन्ही युवकांना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉ. अर्चना बिरारी-सपकाळ यांनी तपासून सुनील साळवे यास मृत घोषित केले तर गोपाल सिंघल व संदीप साळवे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.

तासभर मिळाली नाही मदत
अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन पळ काढल्यानंतर मयत व जखमी २ तरूण तासभर जागेवरच पडून होते. याचवेळी पाऊस सुरू होता. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनातील काही प्रवाशांनी अपघाताचे रिलसाठी व्हीडिओ काढले; परंतु अपघातग्रस्तांना कोणीही मदत केली नाही. शेवटी तळणी येथील सरपंच प्रभाकर वाघ हे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले.
................
 

Web Title: Unknown vehicle hits two-wheeler near Sillod; one dies on the spot, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.