अपघाताचे निमित्त; लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या तरुणाला जंगलात नेत लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:45 IST2025-05-30T12:43:46+5:302025-05-30T12:45:49+5:30

२० हजार रोख रक्कम काढून ऑनलाइन १५ हजार घेतले

Under the pretext of a bike collision; the youth was taken to the forest instead of the police station and robbed | अपघाताचे निमित्त; लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या तरुणाला जंगलात नेत लुटले

अपघाताचे निमित्त; लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या तरुणाला जंगलात नेत लुटले

छत्रपती संभाजीनगर : स्वत:च्या लग्नाच्या खरेदीसाठी शहरात आलेल्या चाळीसगावच्या मंजूर रंगरेज (२१) याला तिघांनी नगरनाका परिसरातील निर्मनुष्य परिसरात नेत मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील २० हजार रोख व ऑनलाइन १५ हजार रुपये घेऊन पसार झाले. २५ मे रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी तरुणाने बुधवारी तक्रार दिल्यानंतर छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मंजूर मेडिकलमध्ये काम करतो. २५ मे रोजी तो त्याचा मित्र अल्तमश शेख सोबत कारने लग्नाच्या खरेदीसाठी शहरात आला होता. रात्री ७ वाजता पडेगावमधून नगर नाक्याच्या दिशेने येत असताना मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या कारला धडक दिली. त्यामुळे मंजूरने कार थांबवून ट्रिपलसीट दुचाकीस्वारांना (एमएच २० - जीए -३३६४) विचारणा केली. तेव्हा दुचाकीस्वार टवाळखोरांनी मंजूर व त्याच्या मित्रालाच शिवीगाळ करून धमकावले. त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाल्याचा दावा करत मंजूरलाच पैशांची मागणी केली. त्यावर मंजूरने त्याची चूकच नसल्याचे सांगत पैसे देण्यास साफ नकार दिला. तेव्हा त्याने वाद वाढवून पोलिस ठाण्यात चलण्यास सांगितले.

ठाण्याऐवजी जंगलात नेले
तिघांपैकी दोघे मंजूरसोबत कारमध्ये बसले. मात्र, पोलिस ठाण्याऐवजी नगर नाक्यावरून केंद्रीय विद्यालयामागील जंगलात घेऊन गेले. तेथे तिघांनी त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या खिशातील खरेदीसाठी असलेले २० हजार रोख रक्कम काढून घेतली. वर फोनपेवरून १५ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. मंजूर या घटनेमुळे घाबरल्याने गावाकडे निघून गेला. २८ मे रोजी शहरात येत त्याने छावणी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली.

Web Title: Under the pretext of a bike collision; the youth was taken to the forest instead of the police station and robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.