पेट्रोल पंपसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील काका-पुतण्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 19:14 IST2025-02-24T19:13:32+5:302025-02-24T19:14:14+5:30
एका पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

पेट्रोल पंपसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील काका-पुतण्याचा मृत्यू
गंगापूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील काका पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना लासूर-गंगापूर मार्गावर बाजार वाडगाव येथे रविवारी (२३) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. दिलीप चंद्रभान थोरात (वय ५२, रा. तांदूळवाडी) आणि श्रीधर रघुनाथ थोरात (वय ३७) अशी मृतांची नावे आहेत.
तांदूळवाडी येथील दिलीप थोरात व श्रीधर थोरात दोघे काका-पुतणे रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास बाजार वाडगाव येथून दुचाकीवर तांदूळवाडी येथे येत असताना बाजारवाडगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चुलते-पुतणे हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी दिलीप थोरात यांना तपासून मृत घोषित केले, तर श्रीधर थोरात यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णाला दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा देखील मृत्यू झाला. या घटनेची शिल्लेगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.