शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'आघाडी करताना तंगड्यात तंगडं घातलं', उद्धव ठाकरेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 16:09 IST

औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री उपस्थित होते.

औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीचं गुणगान गाताना आघाडीवर जबरी टीका केली आहे. 'आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे. त्यामुळे ते नक्कीच पडणार', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर सडकून टीका केली. तसेच 'आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे, असेही उद्धव यांनी म्हटले.  

औरंगाबाद येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप-शिवसेनेचे अनेक मंत्री उपस्थित होते. त्यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 'आघाडी करताना हातात हात घालून तंगड्यात तंगडं घातलं आहे. त्यामुळे ते नक्कीच पडणार', असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीचा पराभव होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे. 'शिवसेनाप्रमुखांनी नेहमी मला गोरगरीबांच्या मुलांची पहिली काळजी घ्यायला, त्यांचे लाड करायला पहिले शिकवले आहे. त्यामुळे माझा, 'भगवा उतरवणे तर सोडाच, कोणाचीही त्या भगव्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होता कामा नये, असा म्हणत उद्धव ठाकरेंनी आघाडीच्या नेत्यांना इशारा दिला आहे. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :

जे काही वाद होते ते मिटले, जबाबदाऱ्यांचे वाटप झालेइथे येईपर्यंत अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्याबाबत चर्चा होती.महाभारतातल्या अर्जुनाप्रमाणे या अर्जुन खोतकर यांना देशद्रोह्याचा डोळा दाखवला.संघर्ष झाला तो झाला, पण आता युतीची जबाबदारी आम्हा दोघांच्या खांद्यावरसंभाजीनगरमधले मूलभूत प्रश्न उदा. समांतर जलवाहिनी, कचऱ्याचा प्रश्न जे जे शक्य आहे ते करून आपण सोडवला पाहिजेमराठवाडा हा भगव्याचा बालेकिल्ला. संभाजीनगरचा हिंदु हा कडवट. त्याला भगव्याचं महत्त्व माहीत आहेआघाडीचे हातात हात आहेत, तर तंगड्यात तंगडं. ते आता पडणारचशिवसेनेने कधीच मागून वार केले नाहीत. शिवसेनेने वारही समोरून  केले आणि दोस्तीही समोरून केली.मतभेद कधीही शिवसेनेने राज्याच्या हिताच्या आड येऊ दिले नाहीतसमृद्धी महामार्गावेळीही आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आम्ही पुढे गेलोमुंबईकरांना 500 स्क्वेअरफूट घराचा मालमत्ता कर माफ करू, हे वचन निभावलंनाणार इथला प्रकल्प रद्द केला. इथले पाणी, चाऱ्याचा प्रश्नही सोडवले गेलेच पाहिजेत. शेतकऱ्यांचे कर्जही माफ झाले पाहिजे.आता शिवसैनिकांनी आरामात राहू नका, युती झाली आता जनतेचे आशीर्वाद मिळवण्याची वेळ आहे.एकवेळ मत मागून मिळतील, पण जनतेचे आशीर्वाद मागून मिळत नाहीत.अनेक योजना जाहीर झाल्या आहेत, त्या राबवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मदत केंद्र सुरू करावीतयुतीने न लढता आपण वेगळं लढत होतो, तेव्हा विरोधकांना माज चढला होता. पण, युती झाल्यानंतर कुठेही त्यांच्या सभा झाल्या नाहीतराधाकृष्ण विखेपाटील म्हणाले की ईडीच्या भीतीने यांनी युती केली, ईडीची भीती कुणाला, तुम्हाला. या ईडापिडा तुमच्याकडे आहेत. आमच्याकडे नाहीतआम्ही जे काही केलं ते खुलेपणाने केलं. पण, विरोधी पक्षातून जो टीका करेल तो पुन्हा त्या पक्षात राहीलच याची खात्री जनतेला राहिलेली नाहीआज आपण सत्तेपेक्षाही लोकांसाठी एकत्र आलो आहोत. आम्हाला सत्ता गोरगरीबांसाठी हवी आहे 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद