शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून २७०० लाभार्थ्यांचे अर्ज रखडले

By admin | Updated: August 18, 2014 01:04 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई अंबाजोगाईत संजय गांधी निराधार योजना समितीचे अनेक सदस्य बैठकीस उपस्थित राहत नसल्याने तालुक्यात जवळपास ४ हजार ५०० वृद्ध व निराधार लाभार्थ्यांचे

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईअंबाजोगाईत संजय गांधी निराधार योजना समितीचे अनेक सदस्य बैठकीस उपस्थित राहत नसल्याने तालुक्यात जवळपास ४ हजार ५०० वृद्ध व निराधार लाभार्थ्यांचे विविध योजनांचे अर्ज गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहेत. गैरहजर राहणाऱ्या सदस्यांच्या बेपर्वाईचा मोठा फटका निराधारांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत समाजातील उपेक्षित निराधार, विधवा, परित्यक्त्या, अपंग व वृद्धांना शासनाच्या श्रावणबाळ, संजय गांधी योजनेच्या माध्यमातून जगण्याचा आधार उपलब्ध व्हावा या उद्देशाने मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत केली जाते. ही आर्थिक मदत मिळविण्यासाठी तहसील कार्यालयाअंतर्गत संजय गांधी निराधार योजना समिती शासनाने स्थापन केली आहे. या समितीत सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठा भरणा आहे. तालुक्यातील निराधारांचा आधार बनण्याची मोठी ताकद त्यांच्या पदात आहे. मात्र, त्यांच्या निष्काळाजीपणामुळे व बैठकीस बोलावूनही उपस्थित राहत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून २७०० वृद्धांचे व निराधारांचे अर्ज रखडले आहेत. शासनाच्या लोकोपयोगी योजना उपेक्षितांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची असते. मात्र, पद मिळताच ते कार्यकर्ते पदाची जबाबदारी स्वीकारत नसल्याचा मोठा फटका उपेक्षितांना सहन करावा लागत आहे. या संदर्भात वृद्ध, निराधार यांचे वारंवार, मोर्चे आंदोलने होऊनही याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी अनेकांचे अर्ज तहसील कार्यालयात धूळ खात पडून आहेत. सर्व सदस्यांना एकत्रित आणणार - अमर देशमुखसंजय गांधी निरधार योजना समितीच्या सदस्यांना वारंवार बैठकीचे निमंत्रण देऊनही ते उपस्थित राहत नसल्याने निराधारांचे अर्ज निकाली काढण्यात मोठा अडथळा येत आहे. सर्व सदस्यांना अर्ज बोलावून अर्ज निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अमर देशमुख लोकमतशी बोलतांना म्हणाले. प्रश्न निकाली लावण्याची मागणी आहे.वृद्ध व निराधारांना आर्थिक साह्य योजनेद्वारे न्याय मिळवून देण्यात अंबाजोगाई तालुक्यातील समिती कुचकामी ठरल्याने ती बरखास्त करावी अशी मागणी ज्येष्ठ समाज सेवक डॉ. द्वारकादास लोहिया यांनी केली आहे. योजनेचे सदस्य आपले कर्तव्य विसरल्याने लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत. अशा पदाची जाणीव नसणाऱ्या सदस्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही डॉ. लोहिया म्हणाले. तसेच निराधारांच्या रखडलेल्या अर्जाबाबत गांभीर्याने विचार न झाल्यास तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करू असा इशारा डॉ. लोहिया यांनी दिला आहे. सदस्यांच्या गैरहजेरीचा अहवाल पाठविणार वरिष्ठांकडे या संदर्भात अंबाजोगाईचे तहसीलदार राहुल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, समितीची बैठक बोलावल्यानंतर सर्व सदस्य उपस्थित राहत नसल्याने अर्जांची संख्या वाढत चालली आहे. सदस्यांच्या गैरहजेरीचा अहवाल आपण जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे तहसीलदार म्हणाले. लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल.