शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याकाठी दोन टक्के उपसा

By admin | Updated: December 28, 2014 01:16 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळी परिस्थितीमुळे लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीच आरक्षित केलेले आहे. असे असताना देखील आरक्षित पाणीसाठ्यामधून महिन्याकाठी

व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळी परिस्थितीमुळे लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यापूर्वीच आरक्षित केलेले आहे. असे असताना देखील आरक्षित पाणीसाठ्यामधून महिन्याकाठी २ टक्के पाणीसाठा कमी होत आहे. झपाट्याने पाणीसाठा कमी होण्याचे कारण अवैध पाणी उपसा असून, याबाबतच प्रशासनाने योग्य उपाय-योजना केल्या नाहीत तर जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.मराठवाड्यात गेल्या काही वर्षापासून बीड जिल्हा ऊस उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा होण्याचे एक कारण ऊस उत्पादन हे आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध पाणीसाठ्यात बाष्पीभवनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होते. पर्यायाने पाण्याची पातळी कमी होत चालली आहे़जिल्ह्यात एकूण १४१ सिंचन प्रकल्प आहेत. यामध्ये मोठ्या दोन प्रकल्पाचा समावेश आहे. माजलगाव प्रकल्पात १३३.९० द.ल.घ़मी़ आहे. म्हणजेच उपयुक्त पाणीसाठा निरंक आहे तर मांजरा कोरडे पडले आहे. बिंंदूसरा प्रकल्पातील पाणीसाठा १५ नोव्हेंबर दरम्यानच संपला आहे. जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.उन्हाळा सुरू होण्यासाठी अजून दीड महिन्याचा अवधी बाकी आहे. जिल्ह्यातील १४१ सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. महिन्याकाठी २ टक्के पाणी उपलब्धसाठ्यांमधून कमी होत असल्याचे समोर आले आले. याप्रमाणात पाणीसाठा कमी होत राहिला तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येणार आहे.जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या दलानात दीड महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या, परंतु अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अवैध पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे़पाणी उपशाबाबत कडक निर्बंध लावले पाहिजेत, अशी मागणी आता ठिकठिकाणच्या गावांमधून पुढे येत आहे़