नागपूर- मुंबई महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 18:18 IST2019-06-04T18:11:47+5:302019-06-04T18:18:34+5:30

अपघातात एक महिला व युवकाचा मृत्यू झाला. 

Two people were killed in an unknown vehicle hitting; while crossing the Mumbai highway | नागपूर- मुंबई महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार 

नागपूर- मुंबई महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार 

लासूर स्टेशन (औरंगाबाद ) : नागपूर- मुंबई महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत  दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. अपघातात एक महिला व युवकाचा मृत्यू झाला. 

देविदास बाजीराव गवळी ( 21, रा. गवळीशिवरा ) व चंद्रकलाबाई बाबुराव राहणे ( रा. कसाबखेडा) असे मृतांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गवळीशिवरा येथून देविदास हा त्याची मावशी चंद्रकलाबाई यांना कसाबखेडा येथे दुचाकीवरून सोडण्यासाठी जात होता. सकाळी आठ वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गा ओलांडताना खडकनारळा चौफुलीवर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यावेळी चंद्रकलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर देविदास याला उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. देवीदास याच्या पश्चात बहिण आणि आई असा परिवार आहे. 

Web Title: Two people were killed in an unknown vehicle hitting; while crossing the Mumbai highway