औरंगाबाद जवळ भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:27 IST2018-06-10T00:27:04+5:302018-06-10T00:27:38+5:30

भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर औरंगाबादकडे परत येणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव टँकरने चिरडले. या अपघातात दोन दुचाकीस्वार तरुण ठार झाले. हा भीषण अपघात शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पडेगाव रस्त्यावर झाला.

Two people killed two-wheelers in a tanker near Aurangabad | औरंगाबाद जवळ भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार दोनजण ठार

औरंगाबाद जवळ भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार दोनजण ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर औरंगाबादकडे परत येणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव टँकरने चिरडले. या अपघातात दोन दुचाकीस्वार तरुण ठार झाले. हा भीषण अपघात शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पडेगाव रस्त्यावर झाला.


बंटी सुभाष शिंदे (१७, रा. विजयनगर) आणि ऋषिकेश अशोक पैठणकर (१६, रा. गुरुदत्तनगर, गारखेडा परिसर) अशी मृतांची नावे आहेत. बंटी आणि ऋषिकेश हे दोघे मित्र असून, ते शनिवारी सायंकाळी खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी मोटारसायकलने गेले होते. दर्शनानंतर दोघे औरंगाबादकडे परतत असताना पडेगावजवळ समोरून आलेल्या हिदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरने त्यांना जोराची धडक दिली. त्यात एक जण टँकरच्या चाकाखाली आला व दुसरा रस्त्यावर फेकल्या गेला. चाकाखालचा मृतदेह काढण्यासाठी पोलिसांना टँकरला जॅक लावावा लागला. छावणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माधव पुरी आणि वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी आणि मृताला तात्काळ मोबाईल व्हॅनमधून घाटीत दाखल केले. अपघात विभागात उपचार सुरू असताना बंटीचा मृत्यू झाला.
नगरनाका ते मिटमिटा रस्त्यावर वर्दळ असते. या रस्त्यावर दुभाजक नाही. त्यामुळे वाहनचालक ओव्हरटेक करताना लेन सोडतात व अपघात होतात. दुभाजक टाकणे आवश्यक असल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Two people killed two-wheelers in a tanker near Aurangabad