शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेने दोघे ठार

By admin | Updated: December 23, 2015 00:08 IST

वाळूज महानगर : भरधाव कारने दुचाकीला टक्कर दिल्यामुळे दुचाकीस्वार लिपिक व प्राध्यापक ठार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री खोजेवाडी फाट्याजवळ घडली

वाळूज महानगर : भरधाव कारने दुचाकीला टक्कर दिल्यामुळे दुचाकीस्वार लिपिक व प्राध्यापक ठार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री खोजेवाडी फाट्याजवळ घडली. कारचालकही गंभीर जखमी असून त्याच्यावर बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.स्वप्नील बाळासाहेब गायकवाड (२४, रा. पिसादेवी रोड, हर्सूल) व दिग्विजय अंकुश काकडे (२९, रा. आनंदपूर, ता. पैठण) हे दोघे लासूर स्टेशन येथील छत्रपती शाहू महाविद्यालयात नोकरीस होते. गायकवाड हे लिपिक व काकडे हे प्राध्यापक होते. सोमवारी रात्री हे दोघे दुचाकी (क्रमांक एम.एच.-२०, ए.एक्स-३३८९) वर औरंगाबादकडे येत होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास खोजेवाडी फाट्याजवळ औरंगाबादहून लासूरकडे सुसाट वेगाने जाणाऱ्या कार (क्रमांक एम.एच.-२०, बी.जे.७६५०) च्या चालकाने दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. गायकवाड व काकडे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. अन्य वाहनधारकांनी अपघाताची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. फौजदार अशोक झिने व पोलीस कर्मचाऱ्यांनी कारचालक महादेव भानुदास मुळे (३५, रा. बकवालनगर) व दुचाकीवरील दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गायकवाड व काकडे या दोघांना तपासून मयत घोषित केले. गंभीर जखमी कारचालक महादेव मुळे याच्यावर बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरूआहेत. या प्रकरणी नीलेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात कार चालकाविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक झिने करीत आहेत.दुचाकी व कारचा चुराडाया भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला असून कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर या महामार्गावरून जाणारे अय्युब पटेल यांनी अपघाताची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली होती. गायकवाड यांचा घटनास्थळीच तर काकडे यांचा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाल्याची माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली.