पडेगाव रोडवरील भीषण अपघातात दोन ठार,एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 15:43 IST2018-02-07T15:39:53+5:302018-02-07T15:43:22+5:30
दुचाकीवर घरी परतणा-या तिघांचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात दोन युवक जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे.

पडेगाव रोडवरील भीषण अपघातात दोन ठार,एक जखमी
औरंगाबाद : रात्रीचे जेवण करून दुचाकीवर घरी परतणाऱ्या तिघांचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात दोन युवक जागीच ठार झाले असून एक जण गंभीर जखमी आहे.
या बाबत छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत हिवाळे, शुभम राऊत व आकाश सोनवणे हे तिघेही पडेगाव येथे राहतात. मंगळवारी रात्री जेवण करण्यासाठी ते पडेगाव येथून बाहेर पडले. जवळच्या परिसरातच जेवणानंतर तिघेही एकाच दुचाकीवर (एमएच २० -डीजी - २४५९ )बसून घराकडे निघाले. याच दरम्यान रात्री जवळपास १.३० वाजेला पडेगाव रोडवर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
यानंतर या भीषण अपघाताची माहिती स्थानिकांनी छावणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन तिघांना शासकीय रुग्णालय घाटी येथे दाखल केले. येथे डॉक्टरांनी श्रीकांत व शुभम यांना तपासून मृत घोषित केले. आकाशवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.