शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
2
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
3
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
6
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
7
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
8
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
9
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
10
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
11
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
12
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
13
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
14
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
15
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
16
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
17
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
18
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
19
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
20
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
Daily Top 2Weekly Top 5

बावीस पोलिसांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या

By admin | Updated: May 31, 2014 00:27 IST

परभणी : जिल्ह्यातील २२ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर झाल्या आहेत. त्यात नऊ अधिकारी पदोन्नतीवर बदलून गेले आहेत.

परभणी : जिल्ह्यातील २२ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर झाल्या आहेत. त्यात नऊ अधिकारी पदोन्नतीवर बदलून गेले आहेत. या अधिकार्‍यांना ३० मे रोजी निरोप देण्यात आला. पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार या बदल्या झाल्या आहेत. बदली झालेल्या अधिकार्‍यांमध्ये पोलिस निरीक्षक आर. एन. चाटे (बीड), एल. ए. शिनगारे (औरंगाबाद शहर), पोलिस निरीक्षक एस. डी. सोनवणे (बीड), निरीक्षक जी. एच. शेटे (भंडारा), निरीक्षक व्ही. एच. हाशमी (औरंगाबाद शहर), सहायक निरीक्षक विकास पाटील (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) सहायक निरीक्षक जी. एम. सोंडारे (लाचलुचपत प्रतिबंधक),सहायक निरीक्षक वाय. ए. चव्हाण (कोल्हापूर), एस. एल. गुठ्ठे (एस.आय.डी), सी. ए. कदम (वाशिम), आर. बी. सहाने (नांदेड), एस. आर. कोल्हे (पोलिस प्रशिक्षण केंद्र लातूर), उपनिरीक्षक भिंगारदेव (महामार्ग सुरक्षा पथक), मो. युनूस मो. मुसा (महामार्ग सुरक्षा पथक), सी. ए. कदम (वाशिम), आर. व्ही. सहाने (नांदेड), के. वाय. तरोणे (नांदेड), महिला उपनिरीक्षक सुलभेवार (नांदेड), उपनिरीक्षक पी. जी. सुसर (नांदेड), बी. बी. तांबे (विशेष सुरक्षा पथक), उपनिरीक्षक आर. आर. तरकसे (नांदेड परिक्षेत्र), आर. टी. दोढी (नांदेड परिक्षेत्र), बी. जी. कुरे (नांदेड परिक्षेत्र), निरीक्षक सुनील जैतापूरकर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) या पोलिस अधिकार्‍यांची बदली झाली आहे. त्यापैकी सहायक निरीक्षक एस. आर. कोल्हे, सी. एन. कदम, आर. व्ही. सहाने यांची पोलिस निरीक्षकपदी तर उपनिरीक्षक सुलभेवार, पी. जी. सुसर, आर. टी. दोडी, आर. आर. तरकसे, बी. बी. तांबे, के. वाय. तरोणे यांची सहायक निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. (प्रतिनिधी)पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात या बदली झालेल्या अधिकार्‍यांना ३० मे रोजी निरोप देण्यात आला. अधीक्षक संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. इतर जिल्ह्यात काम करताना पोलिस दलाचे नाव व लौकिक वाढवावा व जनमाणसात पोलिस दलाची प्रतिमा उज्ज्वल व्हावी, असे काम करण्याचे आवाहन संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमास सहायक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, संजय हिबारे, माढेकर, राखीव निरीक्षक पंडित राठोड, कार्यालयीन अधीक्षिका कुलथे, रोहिणी पाथरकर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विवेक मुगळीकर यांनी केले. संजय हिबारे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी इरफान इनामदार, शब्बीर पठाण, दत्ता चिंचाणे, राजेश अगाशे, वंदना आदोडे आदींनी परिश्रम घेतले.