शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

डझनभर लाचखोर अडीच महिन्यात जेरबंद

By admin | Updated: August 18, 2014 01:00 IST

उस्मानाबाद : लाचलूचपत प्रतिबंधक पथकाच्या पोलीस उपाधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर अश्विनी भोसले यांनी लाचखोरांविरूध्द कारवाईचे सत्र सुरू केले आहे़

उस्मानाबाद : लाचलूचपत प्रतिबंधक पथकाच्या पोलीस उपाधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर अश्विनी भोसले यांनी लाचखोरांविरूध्द कारवाईचे सत्र सुरू केले आहे़ अडीच महिन्याच्या कालावधीतच नऊ सापळे रचून ११ जणांना रंगेहाथ जेरबंद केले आहे़ तर एका प्रकरणात वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे उपविभागीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी असे बडे मासेही भोसले यांच्या सापळ्यात अडकले आहेत़नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थीनीस जातीचे प्रमाणपत्र व बारावीची सनद देण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना ७ जून रोजी संस्थापक मनोहर बदामे व ट्यूटर निलम शेख यांना जेरबंद करण्यात आले़ लाचखोरांविरूध्द भोसले यांच्या प्रभारी कार्यकाळात केलेला हा पहिला यशस्वी सापळा होता़ त्यानंतर २७ जून रोजी परंडा तालुक्यातील सिरसाव तलाठी सज्जाचे तलाठी मोहन बसवेश्वर स्वामी यांना गारपीट अनुदानासाठी अज्ञान पालकाची नोंद कमी करून सातबारा देण्यासाठी शेतकऱ्याकडून ४०० रूपयांची लाच घेताना रंगेहात जेरबंद केले़ तत्पूर्वी १० जून रोजी तडवळा (ता़तुळजापूर) सज्जाच्या तलाठी सुकेशिनी कांबळे यांनी शेतजमिनीचा फेरफार मंजूर करून सातबारा देण्यासाठी १५०० रूपयांच्या लाचेची मागणी एसीबीने लावलेल्या सापळ्यादरम्यान पंचासमक्ष केली होती़ या प्रकरणी वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात आला होता़ वरिष्ठांच्या सूचननंतर ३ जुलै रोजी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ १२ आॅगस्ट रोजी वाशी तालुक्यातील इजोरा येथील ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचे बील काढण्यासाठी ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून २० हजार रूपये स्विकारणाऱ्या सरपंच छाया गोकूळ चव्हाण व रोजगार सेवक नवनाथ सुनिल कुंभार यांना जेरबंद केले़ १६ आॅगस्ट रोजी तक्रारदाराने घराच्या जागेत घेतलेल्या बोअरची ग्रामपंचायतीच्या आठ अ ला नोंद करून तसा आठ अ देण्यासाठी २५० रूपयांची लाच घेताना समुद्रवाणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बालाजी वाघमारे यांना जेरबंद करण्यात आले़ तर दुसऱ्याच दिवशी १७ आॅगस्ट रोजी जागजीचे मंडळ अधिकारी पोपट सोमनाथ मोराळे यांना इर्ला येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनीची लागलेल्या निकालाप्रमाणे सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी एक लाख रूपये लाचेची मागणी करून खासगी इसम रामेश्वर सुखदेव काकडे याच्या मार्फत स्विकारताना ९० हजार रूपयांची लाच स्विकारताना जेरबंद करण्यात आले़ (प्रतिनिधी)