अडीच लाखांची शहागड येथे घरफोडी

By Admin | Updated: June 13, 2015 23:48 IST2015-06-13T23:48:39+5:302015-06-13T23:48:39+5:30

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील शहागड येथे १२ जून रोजी मध्यरात्री एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला.

Twenty-two lakhs of burglars at Shahgarh | अडीच लाखांची शहागड येथे घरफोडी

अडीच लाखांची शहागड येथे घरफोडी


वडीगोद्री : अंबड तालुक्यातील शहागड येथे १२ जून रोजी मध्यरात्री एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली असून या भागात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
कादर उस्मान कुरैशी यांच्या घराचे कुलूप तोडून तीन चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास घरात प्रवेश केला. कादर उस्मान यांच्या पत्नी साहेरा बेगम या झोपेत असतानाच त्यांना चोरट्यांनी काठीने मारहाण केली. कपाटातील रोख ३० हजार रुपये व २ लाख रुपये किंमतीचे दागिने असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेची माहिती कळताच गोंदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, उपनिरीक्षक सोमनाथ शिंदे घटनास्थळी हजर झाले. तात्काळ परिसरात गेवराई, अंबड, पैठण येथे माहिती देऊन पोलिसांनी नाकाबंदी केली. परंतु चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. चोरट्यांच्या हल्ल्यात साहेरा बेगम जखमी झाल्या आहेत.
या चोरीच्या तपासासाठी एक पथक पाठविण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी दिली. या घटनेचा गुन्हा गोंदी पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यासंदर्भात पोलिसांनी गस्त वाढवावी, जेणेकरून चोरीच्या घटना कमी होतील, असेही ग्रामस्थांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Twenty-two lakhs of burglars at Shahgarh