शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी अडीच कोटी मंजूर

By admin | Updated: April 25, 2016 23:33 IST

परभणी : जिल्हा आदिवासी उपयोजनेने तयार केलेल्या आगामी वर्षाच्या वार्षिक आराखड्यात २ कोटी ४२ लाख ३४ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली

परभणी : जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा आदिवासी उपयोजनेने तयार केलेल्या आगामी वर्षाच्या वार्षिक आराखड्यात २ कोटी ४२ लाख ३४ हजार रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीमधून आदिवासी समाजबांधवांसाठी विकास योजना राबविल्या जाणार आहेत.जिल्हा नियोजन समितीच्या वतीने विविध भागांच्या विकासासाठी दरवर्षी कृती आराखडा तयार केला जातो. यानुसार जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी आदिवासी उपयोजना (ओटीएसपी) अंतर्गत २०१६-१७ या वर्षाचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आदिवासी समाजासाठी योजना राबविल्या जातात. २०१६-१७ या वर्षासाठी पीक संवर्धन, पशुसंवर्धन, एकात्मिक ग्रामविकास, मागासवर्गीयांचे कल्याण, कामगार कल्याण अशा उपशिर्षनिहाय योजनांचे नियोजन करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात आदिवासी समाजाची संख्या तुलनेने कमी असून या प्रकल्पांतर्गत आदिवासी समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी वेगवेगळ्या घटकान्वये उपयोजना राबविल्या जात आहेत.आगामी वर्षासाठी केलेल्या नियोजनानुसार आदिवासी शेतकरी कुुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी अर्थ सहाय्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी ५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तर दुभत्या जनावरांच्या गटांच्या वाटपासाठी ३ लाख २० हजार, शेळ्या गटाच्या वाटपासाठी २ लाख ८० हजार, इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जमातीतील उमेदवारांच्या निर्वाह भत्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी विकसित करण्याच्या उद्देशाने ५० हजार रुपये आणि शिकाऊ उमेदवारांसाठी निर्वाहभत्ता म्हणून ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.महिला व बालकल्याण समितीअंतर्गतही आदिवासींच्या योजनांसाठी ३ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. (प्रतिनिधी)जिंतूर तालुक्यात सर्वाधिक लाभार्थीपरभणी जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गात येणाऱ्या आदिवासी समाजाची संख्या इतर जिल्ह्याच्या तुुुलनेत अत्यल्प आहे. जिंतूर तालुक्यात हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्याही अधिक आहे. सोनपेठ, पाथरी तालुक्यातही तुरळक प्रमाणात लाभार्थी उपलब्ध आहेत. हिंगोली जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत परभणी जिल्ह्यात आदिवासींच्या विकासासाठी योजना राबविल्या जातात.