कुंभारवाडा नव्हे तुळशीबाग; औरंगाबादमधील ४६ जातिवाचक वसाहतींची नावे बदलली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 01:12 PM2022-05-21T13:12:25+5:302022-05-21T13:12:55+5:30

शासनाने महापालिकेमार्फत जातिवाचक वसाहतींच्या नावांची यादी मागवली होती.

Tulshibagh, not Kumbharwada; The names of 46 caste decoding colonies in Aurangabad have been changed | कुंभारवाडा नव्हे तुळशीबाग; औरंगाबादमधील ४६ जातिवाचक वसाहतींची नावे बदलली

कुंभारवाडा नव्हे तुळशीबाग; औरंगाबादमधील ४६ जातिवाचक वसाहतींची नावे बदलली

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील विविध वसाहतींना जातिवाचक नावे देण्यात आली होती. मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने जातीवर आधारित वसाहतींची नावे कोणती याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. महापालिकेने ५४ वसाहतींना अशी नावे असल्याचे कळविले. त्यांतील ४६ नावे बदलण्याचा निर्णय शुक्रवारी शासनाने घेतला.

गुलमंडी-औरंगपुरा भागातील कुंभारवाड्याचे नाव आता तुळशीबाग राहील. रंगारगल्लीचे नाव हिंगलाजनगर, जोहरीवाड्याचे नाव पारसनगर, भोईवाडा (नागेश्वरवाडी)-गंगापुत्र कॉलनी, पारधीपुरा-जीवकनगर याप्रमाणे ४६ वसाहतींची नावे बदलण्यात आली आहेत.

सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय काढला आहे. जातिवाचक नावांमुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन जातीय संघर्ष होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शासनाने महापालिकेमार्फत जातिवाचक वसाहतींच्या नावांची यादी मागवली होती. या यादीनुसार नागरिकांकडून नावे बदलण्याचे प्रस्ताव घेतले. तसेच त्यावरही आक्षेप नोंदविण्यात आले. आक्षेपांची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर ५४ नावांपैकी ४६ वसाहतींची नावे बदलण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

जातिवाचक वसाहतींची बदललेली नावे
प्रभाग क्र.-१२ मधील कुंभार गल्ली-गोरोबा काका गल्ली, ब्राह्मण गल्ली- जगदंब गल्ली, मल्लावपुरा- सावता गल्ली, प्रभाग क्र. १३ मधील भिल्ल गल्ली भीमनगर-एकलव्यनगर, प्रभाग क्र. १६- मांगवाडा- मुक्ताईनगर, चांभारवाडा- संत रोहिदास गल्ली, भंगीवाडा- वाल्मिकीनगर, प्रभाग क्र. १८- बौद्धवाडा- सारनाथ गल्ली, प्रभाग क्र.२२- मोमीनपुरा-सुलतानपुरा, प्रभाग क्र.२३- धोबीघाट- संत गाडगेबाबा धोबीघाट, प्रभाग क्र. ४६- तेलंगवाडा-बिरसा मुंडा मोहल्ला, गवळीपुरा-विकासपूर, प्रभाग क्र. ४८- कुंभारवाडा-तुळशीबाग, जोहरीवाडा-पारसनगर, रंगार गल्ली- हिंगलाजनगर, प्रभाग क्र. ४९ माळीवाडा- सावतानगर, प्रभाग क्र. ५१-भोईवाडा- गंगापुत्र कॉलनी, पारधीपुरा-जीवकनगर, प्रभाग क्र. ५३-बौद्धवाडा (पैठणगेट)-किरणनगर, प्रभाग क्र.६७- कैकाडीवाडा-शाश्वतनगर, प्रभाग क्र.६८-भोईवाडा-उदय कॉलनी, प्रभाग क्र.७ गोंधळीवाडा-जगदंबा नगर, प्रभाग क्र.१- धनगर गल्ली-होळकरनगर, कैकाडी गल्ली- जाधववाडा, चांभारगल्ली- एकतानगर, प्रभाग क्र.२- ब्राह्मणगल्ली-उन्नतीनगर, मांगवाडा- लहुजीनगर, सोनारगल्ली-प्रेरणानगर, प्रभाग क्र. ८९- धनगरवाडा-अहिल्याबाई होळकरनगर, साठेनगर- अण्णा भाऊ साठे नगर, बौद्धवाडा- गौतम बौद्धनगर, सुतारवाडा-अयोध्यानगर, माळी गल्ली- महात्मा फुलेनगर, कुंभारवाडा - संत गोरोबानगर, तेली गल्ली- अमृतनगर, ब्राह्मणगल्ली-परशुराम नगर, चांभारवाडा- संत रोहिदास नगर, प्रभाग क्र. ८८- कुरेशी मोहल्ला- सय्यद सादात मोहल्ला, प्रभाग क्र. ११३-वैदुवाडा- जयदुर्गानगर, प्रभाग क्र. ७०-मोची मोहल्ला- बाबा रामदेवनगर याप्रमाणे वसाहतींची नावे बदलण्यात आली आहेत.

Web Title: Tulshibagh, not Kumbharwada; The names of 46 caste decoding colonies in Aurangabad have been changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.