शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 3, 2015 00:57 IST

जालना : जालना-मंठा मार्गावरील रामनगर येथे युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना गस्तीवर असलेल्या मौजपुरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

जालना : जालना-मंठा मार्गावरील रामनगर येथे युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना गस्तीवर असलेल्या मौजपुरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. दरम्यान, चोरट्यांनी या गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकलही चोरीची असल्याचे उघडकीस आले आहे.रामनगर येथील बालाजी गल्ली भागात मौजपुरी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरवसे, पोलिस जमादार सय्यद मजीद व नाईक पोलिस कॉन्स्टेबल डी.एन. राऊत हे तिघे मध्यरात्री २.१५ ते २.३० या वेळेत गस्तीवर असताना एटीएमजवळ एक मोटारसायकल त्यांना उभी असलेली दिसली. एवढ्या रात्री एटीएममध्ये कोण आहे, हे तपासून पाहण्यासाठी पोलिस एटीएमजवळ गेले. त्याचवेळी दोन इसम एटीएम मशिनला हलवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना दिसले. पोलिसांना बघताच त्या दोघांनी तेथून पळ काढला, परंतु पोलिस कर्मचारी मजीद व राऊत यांनी २ ते ३ कि़मी. अंतरावर पाठलाग करून आरोपींना पकडले. रज्जाक हसन तुंडीवाले (२५) व अफजल गफ्फार परसुवाले (२४, रा. दोघेही मजरेवाडी, ता. बदनापूर) अशी या आरोपींची नावे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यात एक सुरा, चाकू, कुऱ्हाड, पक्कड, हॅन्डग्लोज, मंकी कॅप व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या आरोपींची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी चौकशी केली असता या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले आहे.ही मोटारसायकल तालुका जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे आरोपींनी सांगितले. (प्रतिनिधी)४मागील काही दिवसांपूर्वी जालना शहरात सदर बाजार हद्दीतील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे या आरोपींनी पोलिसांच्या चौकशीत सांगितले. या आरोपींकडून एटीएम, चैन स्रेचिंग, चोरी, घरफोडी यासारखे अन्य गुन्हे उघडकीस होऊ शकतात, असा अंदाज सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरवसे यांनी व्यक्त केला. ४पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहरातील वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांसंदर्भात पोलिस अधीक्षकांनी ३१ जानेवारी रोजी सर्व प्रमुख पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.