शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रू लाईफ कंपनी’चा फॉल्स फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 00:32 IST

औरंगाबाद : तीन राज्यांतील सहा हजारांवर नागरिकांना तीन कोटींचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या ‘ट्रू लाईफ व्हिजन प्रा. लि.’ कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक

आर्थिक गुन्हे शाखेने उधळला डाव : तीन कोटींचा गंडा; सात जण अटकेतऔरंगाबाद : तीन राज्यांतील सहा हजारांवर नागरिकांना तीन कोटींचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या ‘ट्रू लाईफ व्हिजन प्रा. लि.’ कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक दीपक जिभाऊ सूर्यवंशी (३७, रा. कामटवाडा, नाशिक) याच्यासह सात जणांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री जेरबंद केले. या कारवाईमुळे भविष्यात होणारी अनेकांची फसवणूक टाळण्यात पोलिसांना यश मिळाल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.अटक केलेल्या अन्य आरोपींमध्ये शंकर प्रकाश निकम (३६, रा. शेंदुरवादा, जि. औरंगाबाद), राजेंद्र दादासाहेब भुसे (३५, रा. चापडगाव, जि.नगर), अरुण चंद्रभान मोगल (३०, रा. शिवाजीनगर, औरंगाबाद), परमेश्वर रावसाहेब लोंढे (२९, रा. नीलजगाव फाटा, जि. औरंगाबाद) आणि रविराज जवाहर राठोड (२७, रा. देवळाई चौक, औरंगाबाद) यांचा समावेश आहे. ही कारवाई करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेला पोलीस आयुक्तांनी (पान २ वर)अशी होती कार्यपद्धतीमहाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांत ‘ट्रू लाईफ’ने जाळे विणले होते. साखळी पद्धतीने जास्तीत जास्त सभासद करणाऱ्यांना क्रमाक्रमाने सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम, रुबी, डायमंड व क्राऊन क्लबमध्ये प्रवेश देऊन करोडपती केले जाईल, असे आमिष सूर्यवंशीने दाखविले होते. ३,७०० ते ५,००० रुपयांपर्यंतची रक्कम सभासदांना कंपनीच्या महाराष्ट्र बँकेतील खात्यावर जमा करण्यास भाग पाडले जात होते. अशा प्रकारे तीन राज्यांतील ६३०० सभासदांकडून तीन कोटी रुपये जमा करण्यात आले होते.नाशिकमध्ये झाडाझडती1दीपक सूर्यवंशी याला अटक करताच औरंगाबाद पोलिसांचे पथक नाशिकला रवाना झाले. सूर्यवंशी याच्या कामटवाडा भागातील सिद्धीविनायक ब्लासम अपार्टमेंटमधील फ्लॅटची तसेच त्याच्या कार्यालयाची झडती घेण्याचे काम सुरू होते. काही महत्त्वांची कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली असून, सूर्यवंशीच्या कार्यालयास सील ठोकण्यात आले आहे.‘केबीसी’ शी साटेलोटे?2राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ‘केबीसी’ कंपनीचा म्होरक्या भाऊसाहेब चव्हाण हा नाशिकचाच रहिवासी आहे. ‘ट्रू लाईफ’चा ‘केबीसी’शी काही संबंध आहे काय, याची तपासणीही केली जाणार असल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले.