बीड बायपासवर ट्रक- दुचाकी अपघातात महिला ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 16:52 IST2018-08-23T16:51:45+5:302018-08-23T16:52:43+5:30

ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली.

Truck-two wheeler accident at Beed Bypass - One Women killed | बीड बायपासवर ट्रक- दुचाकी अपघातात महिला ठार 

बीड बायपासवर ट्रक- दुचाकी अपघातात महिला ठार 

औरंगाबाद : संग्रामनगर उड्डाणपुला समोरील बीड बायपासवर सिग्नल जवळ झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. लताबाई श्रीरंग लोलेवार असे मृत महिलेचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी लताबाई लोलेवार या मुलगी अंजली सोबत दुचाकीवरून बीड बायपास रोडवरून जात होत्या. यावेळी संग्रामनगर उड्डाणपुलासमोरील सिग्नलजवळ मागच्या बाजूने येणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात लताबाई जागीच ठार झाल्या. तर अंजली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सातारा पोलीसांनी घटनास्थळी होत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. 

Web Title: Truck-two wheeler accident at Beed Bypass - One Women killed