औरंगाबाद महापालिका आयुक्तांची बदली; अभिजित चौधरी यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 21:25 IST2022-06-29T21:24:27+5:302022-06-29T21:25:09+5:30
मुंबईचे पोलीस आयुक्त पदी आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर औरंगाबादचे पालिका आयुक्त बदलण्यात आले आहेत.

औरंगाबाद महापालिका आयुक्तांची बदली; अभिजित चौधरी यांची नियुक्ती
राज्य सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. यानंतर औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांची बदली करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पांडे यांची बदली औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासकपदी करण्यात आली आहे. दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडून कार्यभार स्वीकारावा असे आदेश अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी दिले आहेत.
मुंबईचे पोलीस आयुक्त पदी आयपीएस अधिकारी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदी असताना विवेक फणसाळकर यांची पदोन्नती करत महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची मे २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या खांद्यावर मुंबईकरांच्या सुरक्षेची धुरा देण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उद्या निवृत्त होणार आहे.