शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

खाम, सुखना नदीच्या पाण्यावर विषारी शेती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:55 IST

खाम, सुखना नदीच्या विषारी पाण्यावर मागील अनेक वर्षांपासून काही शेतकरी पालेभाज्यांची शेती करीत आहेत. औरंगाबादकरांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या या शेतकऱ्यांवर आजपर्यंत कोणत्याच शासकीय यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला नाही. नदीपात्रातील पाणी मोटारी लावून ओढण्याचे काम २४ तास सुरू असते.

ठळक मुद्देबारामाही उद्योग : औरंगाबादकरांच्या आरोग्यासोबत खेळ, कोणतीच शासकीय यंत्रणा कारवाई करीत नाही

औरंगाबाद : खाम, सुखना नदीच्या विषारी पाण्यावर मागील अनेक वर्षांपासून काही शेतकरी पालेभाज्यांची शेती करीत आहेत. औरंगाबादकरांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या या शेतकऱ्यांवर आजपर्यंत कोणत्याच शासकीय यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला नाही. नदीपात्रातील पाणी मोटारी लावून ओढण्याचे काम २४ तास सुरू असते. भूमिगत गटार योजनेमुळे तर अनेक शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाल्यासारखे झाले आहे. महापालिकेने आतापर्यंत दोन वेळेस कारवाईचा बडगा उगारला. प्रत्येक वेळी शेतकºयांच्या विरोधाला प्रशासनास सामोरे जावे लागले.बाजारात हिरव्या भाज्या दिसल्या की कोणीही सुखावतो. या पालेभाज्या दूषित पाण्यावर उगविण्यात आल्या असतील, अशी शंकाही आपल्या मनात येत नाही. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराबाहेर बाराही महिने हिरवीगार दिसणारी शेती नाल्याच्या दूषित पाण्यावर बहरत आहे. या भाज्यांमध्ये शिसे, पारा, जस्त, तांबे, फिनेल, रंग, धुण्याचा सोडा, अमोनियम, फ्लोराईड आणि कोबाल्टसारख्या जड धातूंचा शिरकाव असतो. या पालेभाज्या खाल्ल्यावर तात्काळ परिणाम दिसत नसला तरी भविष्यात यामुळे किडनी, यकृताचे विकार, अर्धांगवायू, लिव्हर सोरायसिस यासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते. या भाज्या खाल्ल्याने कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता असते. शहरातील खाम नदीत (नाला) सोडल्या जाणाºया १३ पेक्षा अधिक नाल्यांच्या या प्रदूषित पाण्यावर नदीकाठचे शेतकरी पालेभाज्या आणि विविध पिके घेत आहेत. नाल्यांमधून नदीमध्ये औद्योगिक व नागरी वसाहतींमधील सांडपाणी जात असल्याने हे पाणी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. या पाण्यात जड धातूसोबतच मानवी विष्ठाही जाते. जड धातू व मानवी विष्ठेतील विषाणू या भाज्यांमध्ये जातात.कोणत्या भागात सर्वाधिक शेतीसुखना नदीपात्रातील शेतीवर चिकलठाणा, हर्सूल, जाधववाडी, मिसारवाडी, पॉवरलूम आदी भागात मोठ्या प्रमाणात शेती होते. खाम नदीच्या पात्रातील पाण्यावर छावणी लोखंडी पुलापासून वाळूजच्या वळदगावपर्यंत हजारो एकर शेती करण्यात येते. या दूषित पाण्याच्या शेतीवर कारवाई करण्याचे धाडस आजपर्यंत एकाही शासकीय यंत्रणेने दाखविले नाही.भूमिगत गटार योजना संजीवनीमहापालिकेने ३५० कोटी रुपये खर्च करून शहराच्या चारही बाजूंनी भूमिगत गटार योजनेचे काम केले आहे. शहराबाहेरील मोठ्या ड्रेनेजलाईनमधून किमान ९० ते १०० एमएलडी पाणी वाहत असते. नक्षत्रवाडी भागात या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात येते. मागील दोन वर्षांपासून अनेक शेतकरी भूमिगत गटार योजनेच्या चेम्बरमधून पाणी चोरी करीत आहेत. मनपाने दोन वेळेस मोटारी जप्त केल्या. त्याचा कोणताच परिणाम शेतकºयांवर झाला नाही.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादriverनदी