शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आयएसओ ग्रामपंचायतींना पर्यटनाची जोड

By admin | Updated: October 28, 2014 01:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. नियोजित आयएसओ ग्रामपंचायतींचा विकास पर्यटनाच्या

औरंगाबाद : जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. नियोजित आयएसओ ग्रामपंचायतींचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात येणार असून दौलताबाद घाटातील मोमबत्ता तलावात बोटिंग व रोप वे सुरू करण्यासह इतर सुविधा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दीपक चौधरी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींना उत्कृष्ट व दर्जेदार सेवेसाठी दिला जाणारा आयएसओ दर्जा मिळवून देण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. आयएसओसाठीचे ग्रामपंचायतीचे प्रस्ताव दाखल झाले असून संबंधित संस्थेकडून त्यादृष्टीने मार्गदर्शनही करण्यात येत आहे. आयएसओची प्रक्रिया राबविताना यासोबतच काही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नैसर्गिक पर्यटनस्थळांचा विकास करण्याची कल्पना पुढे आली व त्यावर आम्ही त्वरित कामही करीत आहोत.पहिल्या टप्प्यात दौलताबाद घाटातील मोमबत्ता तलावाचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत- जात असतात. त्याशिवाय येथे पर्यटक काही वेळासाठी थांबतातही. त्यामुळे येथे एक पीकनिक स्पॉट सहज विकसित होऊ शकतो. त्यासाठी मोमबत्ता तलावात उतरण्यासाठी सुरक्षित रस्ता तयार करण्यासह तेथे बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला. या स्थळाची पाहणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी केली. त्यानंतर दौलताबाद, कागजीपुरा व मावसाळा येथील सरपंच व उपसरपंच, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांची बैठक बोलावण्यात आली. सदर जागेची कागदपत्रे तपासण्यात आली. ही जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची असल्याने स्थळाचा विकास करणे अधिक सोपे झाल्याचे चौधरी यांनी सांगितले. जिल्हा परिषदेने ही पर्यटन स्थळे विकासाची मांडलेली कल्पना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनाही आवडली. त्यांनी त्यासाठी निधी देण्यास मान्यता दिली आहे. रत्नागिरीहून बोटीसंदर्भात माहितीही घेण्यात आली. यातून ग्रामपंचायतींना उत्पन्न होईल व पर्यटकांचीही मोठी सोय होईल. पहिल्या टप्प्यात दौलताबाद, मावसाळा व कागजीपुरा या तीन ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या पर्यटन स्थळांचा विकास पायलट प्रोजेक्ट म्हणून करण्यात येणार आहे. -उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, पंचायत विभागपहिली बैठक यशस्वी४ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना४कागजीपुऱ्यातही सुंदर तलाव, ऐतिहासिक कागद कारखाना.४मावसाळ्यात हिलस्टेशन, जि.प.चे विश्रामगृह करण्याचा संकल्प.४म्हैसमाळला पर्यटकांसाठी कोणत्या सुविधा द्यावात, विचारमंथन सुरू.