शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

एकाच दिवसाची आज ‘उभारी’; मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांघरी जाणार अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 3:38 PM

मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील कर्ता, कमविता सदस्य गेल्यानंतर निराधार होत असल्याची माहिती डिसेंबर २०१७ मध्ये समोर आली

औरंगाबाद : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील कर्ता, कमविता सदस्य गेल्यानंतर निराधार होत असल्याची माहिती डिसेंबर २०१७ मध्ये समोर आली; परंतु ही माहिती मंडळ स्तरावर महसूल कर्मचाऱ्यांनी कागदोपत्रीच संकलित केल्याचे २६ मार्च रोजी समोर आल्यानंतर ४ एप्रिल या एकाच दिवशी पूर्ण मराठवाड्यातील ४६५ सर्कलमध्ये नव्याने ‘उभारी’ या कार्यक्रमांतर्गत पाहणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जारी केले आहेत. त्यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी पत्र पाठविले आहे. सदरील पाहणी प्रभाव व संवेदनशील पद्धतीने करण्यात यावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. 

उद्या पाहणीमध्ये महसूल कर्मचाऱ्यांसोबत एनजीओचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार आहेत. विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी मराठवाड्यातील ४६५ मंडळांतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाठविले होते. त्याचा अहवाल ७ डिसेंबर २०१७ रोजी तयार झाल्यानंतर धक्कादायक वास्तव पुढे आले होते. ३,९५१ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दारी प्रशासन अधिकारी गेलेच नाहीत. कागदोपत्री एकाच दिवसाची आज ‘उभारी’ अहवाल सादर करून ते कर्मचारी मोकळे झाल्याचे २६ मार्चच्या महिला सक्षमीकरण परिषदेत समोर आले. त्यामुळे यावेळी पाहणी संवदेनशील करून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तांनी आदेशित केले आहे. या आदेशाची अंमलबजाणी बुधवारपासून करण्यात येणार आहे. 

पाहणीमध्ये या  मुद्यांवर भर - कुटुंबांनी मागणी केलेल्या योजनांचा लाभ मिळाला आहे काय?- कुटुंबप्रमुख म्हणून सध्या कोण आहे.

- आत्महत्या करणाऱ्याची मालमत्ता वारसांच्या नावे आहे काय?- कुटुंबाचा सामाजिक प्रवर्ग कोणता आहे. - कुटुंबाचा कोणत्या स्वयंरोजगाराकडे कल आहे.- मागणी केलेल्या योजनेचा लाभ ३० एप्रिलपर्यंत द्यावा.- शेतकऱ्याच्या वारसांची नावे मालमत्तेवर ३० एप्रिलपर्यंत घ्यावीत. - त्याचा अहवाल ५ मेपर्यंत कार्यालयास सादर करावा. 

जिल्हा     कुटुबांची संख्या औरंगाबाद     ४६५जालना    २७४परभणी    ४३३हिंगोली    १६९नांदेड    ६९३बीड              १०२५लातूर     ३४४उस्मानाबाद    ५४८एकूण    ३,९५१

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याMarathwadaमराठवाडाagricultureशेती