शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

सीईटी परीक्षेसाठी आलेल्या बिहारी शिक्षकाला लुटणारे त्रिकूट अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 11:06 PM

बिहारच्या शिक्षकाला बाळापूर फाटा येथे अंधारात नेऊन मारहाण करून लुटणाऱ्या रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद : सीईटी परीक्षा देण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या बिहारच्या शिक्षकाला बाळापूर फाटा येथे अंधारात नेऊन मारहाण करून लुटणाऱ्या रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. ही लुटमार ६ जुलै रोजी रात्री घडली.

रिक्षाचालक विशाल बाळासाहेब जाधव (२१), अनिकेत रावसाहेब हिवाळे (२२, रा. लोकशाही कॉलनी) आणि सतीश रमेश नाथभजन (२३, रा. मुकुंदनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले की, मनीषकुमार सियाराम प्रसाद (२९, रा. शादीपूर, ता. वंशी, जि. अरवल, बिहार) हे शिक्षक असून, त्यांना सीईटी परीक्षेचे केंद्र औरंगाबादेतील बीड बायपासवरील एका शाळेत मिळाले होते.

७ जुलै रोजी त्यांची परीक्षा असल्याने ६ जुलै रोजी ते शहरात आले होते. सिडको बसस्थानक येथून ते मुकुंदवाडी येथे रिक्षाने गेले. तेथील लॉज त्यांना पसंत न पडल्याने ते शिवाजीनगर येथे लॉजकडे जाण्यासाठी रिक्षात बसले. यावेळी रिक्षात आधीच दोन प्रवासी होते. चालकाने मनीषकुमार यांना थेट शिवाजीनगरला न नेता बाळापूर फाट्याकडे नेले.

तेथे अंधारात रिक्षा उभी केल्यानंतर सहप्रवासी म्हणून बसलेल्या आरोपींनी अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. रिक्षाचालकाने त्यांना साथ देत मनीषकुमार यांच्या खिशातील रोख तीन हजार रुपये, गळ्यातील चांदीची चेन, सोन्याची अंगठी आणि मोबाईल असा ऐवज हिसकावून घेतला. या घटनेनंतर मनीषकुमार यांनी मुकुंदवाडी ठाण्यात रविवारी सकाळी तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक राहुल बांगर, कर्मचारी कैलास काकड, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनील पवार यांनी झटपट कारवाई करीत संशयित आरोपींना पकडले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मनीषकुमार यांची लुटलेली चांदीची चेन, मोबाईल, बॅग असा ऐवज काढून दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी