शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार

By admin | Updated: May 30, 2014 01:00 IST

वाळूज महानगर : भरधाव वेगाने औरंगाबादहून नगरकडे चाललेली कार दुभाजकावर धडकून विरुद्ध दिशेने येणार्‍या कंटेनरवर आदळल्याने तिघे ठार झाल्याची घटना आज सायंकाळी जिकठाण फाट्यावर घडली.

वाळूज महानगर : भरधाव वेगाने औरंगाबादहून नगरकडे चाललेली कार दुभाजकावर धडकून विरुद्ध दिशेने येणार्‍या कंटेनरवर आदळल्याने तिघे ठार झाल्याची घटना आज सायंकाळी जिकठाण फाट्यावर घडली. याविषयी अधिक माहिती अशी की, विष्णू गोविंद शेदाळे (४७, रा. अचानकवाडी, ता. जि. अहमदनगर) हे कुटुंबासह आज २९ मे रोजी कार क्रमांक एमएच-१६, आर-१२४२ मध्ये बसून औरंगाबादहून अहमदनगरकडे भरधाव वेगाने चालले होते. अतिशय वेगाने कार नगरकडे जात असताना जिकठाण फाट्यावर कारचालक विष्णू शेदाळे यांचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकावर आदळली. तीन ते चार पलट्या घेऊन ती नगरकडून औरंगाबादकडे येणार्‍या कंटेनर क्रमांक एमएच-१८, एए-०७५० वर धडकली. या भीषण अपघातात कारमधील विष्णू शेदाळे, पत्नी अलका शेदाळे (४0) व मुलगी विशाखा शेदाळे (१८) हे तिघे गंभीर जखमी झाले होते. हा भीषण अपघात बघताच या मार्गावरून ये-जा करणार्‍या वाहनधारकांनी अपघातस्थळी धाव घेऊन या घटनेची माहिती वाळूज पोलिसांनी दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय निकुंभ, सहायक फौजदार ढोले, पोहेकॉ. रेखा चांदे, पोकॉ. संजय वामने आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडे रवाना केले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी रस्त्यातच तिघा जखमींचा मृत्यू झाला. फौजदार संजय निकम पुढील तपास करीत आहेत. थांबलेल्या दुचाकीस्वाराला कारची धडक हा भीषण अपघात झाल्यामुळे अपघातस्थळी दुचाकीस्वार प्रल्हाद भीमराव आखडे (५१, रा. चेंदाई, ता. भोकरदान, जि. जालना) हे थांबून निरीक्षण करीत असताना नगरहून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक एमएच-२० बीएन-६७८१ ने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. नशीब बलवत्तर म्हणून अपघातस्थळी जमा झालेले वाहनधारक तसेच पोहेकॉ. रेखा चांदे व कर्मचारी घटनास्थळावरून प्रसंगावधान राखत लगबगीने दूर गेल्यामुळे थोडक्यात बचावले. या अपघातानंतर कारचालक पळून जाण्याच्या तयारीत असताना वाळूज पोलिसांनी त्यास पकडून चोप दिला. त्याच कारमध्ये जखमी दुचाकीस्वारास उपचारासाठी वाळूजच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.