शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसात उडीदाचा दर चार हजारांनी कोसळले !

By admin | Updated: August 29, 2016 00:56 IST

परंडा/आवारपिंपरी : पावसाळ्याचे जवळपास तीन महिने सरत आले आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील प्रकल्प भरतील असा एकही दमदार पाऊस झालेला नाही.

परंडा/आवारपिंपरी : पावसाळ्याचे जवळपास तीन महिने सरत आले आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील प्रकल्प भरतील असा एकही दमदार पाऊस झालेला नाही. मात्र, अधूनमधून झालेल्या रिमझीम स्वरूपाच्या पावसावर विशेषत: उडीद, मुग ही पिके तरली. सध्या आवारपिंपरीसह परिसरात या पिकांच्या राशींची लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी राशी उरकून उडीद आडतीवर नेताच दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. तीन दिवसात तब्बल चार हजार रूपयांनी दर कोसळले. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत.तीन ते चार वर्षांपासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच जिल्ह्याच्या काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पेरणी उरकली. प्रकल्प भरतील असा एकाही दमदार पाऊस झाला नसला तरी अधूनमधून झालेल्या रिमझीम स्वरूपाच्या पावसामुळे उडीद, मूग ही पिके तगली आहेत. असे असले तरी मागील वीस ते बावीस दिवसांपासून पाऊस नसल्याने या पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. दरम्यान, परिसरात सध्या या पिकांच्या काढणीची लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळावा, म्हणून तातडीने राशी उरकून उडीद आडतीवर नेला. मात्र, उडीद आडतीवर दाखल होताच दरामध्ये प्रचंड घसरण होवू लागली आहे. काही शेतकऱ्यांनी बुधवारी बार्शी येथील आडतीवर उडीद दिला असता ८ हजार ७०० ते ९ हजारापर्यंत दर मिळाला. दुसऱ्या दिवशी मात्र, तब्बल एक ते दीड हजाराने दरात घसरण झाली. शुक्रवारी तर उडीदाला प्रतिक्विंटल सात ते साडेसात हजार रूपये भाव मिळाला. आणि शनिवारी पुन्हा दरामध्ये मोठी घसरण झाली. प्रतिक्वंटल ५ हजार ते ५ हजार ९०० रूपये घेवून घरचा रस्ता धरावा लागत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)