शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

तीन जणांना सहा दिवसांची पोलिस कोठडी

By admin | Updated: July 10, 2014 00:47 IST

सेनगाव : येथील व्यापाऱ्याला गंडा घालीत ११ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोयाबीन लंपास केल्या प्रकरणात सेनगाव पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली

सेनगाव : येथील व्यापाऱ्याला गंडा घालीत ११ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोयाबीन लंपास केल्या प्रकरणात सेनगाव पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींना येथील न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. येथील आडत व्यापारी केदारमल सारडा यांच्या आडत मधील सोयाबीन नागपूर येथे पाठविण्यासाठी बोलाविलेल्या भाडे वाहतूक ट्रक चालकाने ११ लाख १४ हजार रुपये किंमतीचे २७५ पोते सोयाबीन घेऊन पोबारा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी सपोनि बालाजी येवते यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविल्याने सोयाबीन लंपास प्रकरणातील मुख्य आरोपीचा छडा लावण्यात यश मिळविले असून, व्यापाऱ्यांना नियोजित पद्धतीने गंडा घालणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. सोयाबीन लंपास करणारा रिकामा ट्रकसह पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले. सोयाबीन लंपास करणाऱ्या ट्रकची नंबर प्लेट बनावट असून पूर्वनियोजित असणाऱ्या या प्रकरणातील मुख्य आरोपीची नावे पोलिस तपासात पुढे आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आशिष अशोक अंभोरे (रा. साखरखेडा, जि. बुलडाणा), महावीर परसराम जैन (रा .शेंदुरसना ता. सिंदखेडा, जि. बुलडाणा) व प्रभाकर हरिचंद्र शिंदे (रा. शेंदुरसना) या तीन आरोपींना अटक करीत बुधवारी सेनगाव न्यायालयासमोर उभे केले असता पुढील तपासासाठी न्यायालयाने तिन्ही आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी येवते यांनी दिली. मुख्य आरोपीच्या मागावर पोलिस असून, व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीकडून अनेक गुन्ह्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)