ट्रक आणि जीपच्या भीषण अपघातात मुंब्रा येथील तीन केटरिंग कामगार ठार; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:50 IST2019-04-25T11:48:30+5:302019-04-25T11:50:27+5:30

खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

Three Catering workers from Mumbra killed in truck and jeep accident; Four injured | ट्रक आणि जीपच्या भीषण अपघातात मुंब्रा येथील तीन केटरिंग कामगार ठार; चार जखमी

ट्रक आणि जीपच्या भीषण अपघातात मुंब्रा येथील तीन केटरिंग कामगार ठार; चार जखमी

वैजापुर (औरंगाबाद ) : नागपूर-मुंबई महामार्गावर ट्रक अणि जीपच्या भीषण अपघातात तीनजण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. दत्तवाडी जवळ सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातातील मृत आणि जखमी हे मुंब्रा येथील केटरिंग कर्मचारी आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६. ३० वाजेच्या सुमारास खंडाळा ( ता.वैजापूर ) येथून वाळूज एमआयडीसीकडे एक ट्रक सामान घेऊन औरंगाबादकडे येत होता. तर मुंब्रा येथील केटरिंगचे कर्मचारी अमरावती येथून मुंबई कडे जीपमधून जात होते. यावेळी जीप चालक रस्त्यातील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात असताना समोरील ट्रकवर धडकला. यात जीपमधील दोघे जागीच ठार झाले तर पाचजण गंभीर जखमी झाले. एकजणाचा मृत्यू औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना झाला. जखमींवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत आणि जखमींची नावे अद्याप समजली नाहीत. 

नागपूर-मुंबई महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. यावर अनेक खड्डे पडले आहेत. प्रवासादरम्यान वाहन चालकांना मोठ्या कसरतीत वाहन चालवावे लागते. यामुळे येथे मोठ्याप्रमाणावर अपघात होत आहेत अशी माहिती नागरिकांनी दिली आहे. 

मृतांची नावे : इर्शाद, बबलू, आमीर 
जखमी : चालक शाहू जाहीर खान(३२, मुंब्रा ) , अय्युब खान (३७) नुरुद्दीन खान, हरून खान (२५) तिघे राहणार उत्तर प्रदेश. 

Web Title: Three Catering workers from Mumbra killed in truck and jeep accident; Four injured