व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी, तरुणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:38 IST2022-06-10T16:31:47+5:302022-06-10T16:38:29+5:30
विवाहिता शेतात असताना गावातील युवकाने लपून केला व्हिडीओ शूट

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी, तरुणावर गुन्हा दाखल
सिल्लोड (औरंगाबाद) : एका युवकाने गावातीलच एका २७ वर्षीय विवाहीतेचा शेतातील आणि बाथरूममधील आक्षेपार्ह फोटो काढले, व्हिडीओ शूट केला. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहीतेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आसडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर काळू शहा (रा. आसडी ता.सिल्लोड ) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, समीर शहा याने गावातील एका विवाहितेचे तिच्या नकळत आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ घेतले. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी पिडीता तिच्या घरासमोर असताना समीरने मोबाईलमधील आक्षेपार्ह फोटो दाखवत विवाहितेला धमकावले. तसेच माझ्यासोबत संबंध ठेव अन्यथा तुझा न्यूड व्हिडीओ, फोटो सोशल मीडियात व्हायरल करेल अशी धमकी दिली.
वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पिडीतेने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांनी कलम 354(अ),354(क),354(ड),506 भादवी सह कलम 3(1)(w)(i)(ii),3(2)(va)अजाजका,कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव हे करत आहे.