पोळ्यासाठी हजार पोलीस दिमतीला
By Admin | Updated: August 25, 2014 01:39 IST2014-08-25T00:12:58+5:302014-08-25T01:39:40+5:30
बीड : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे़ जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या जोडीला एक हजार पोलिसांची

पोळ्यासाठी हजार पोलीस दिमतीला
बीड : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे़ जिल्ह्यात स्थानिक पोलिसांच्या जोडीला एक हजार पोलिसांची वाढीव कुमक घेतली आहे़ दहा ठाण्यांमध्ये जादा बंदोबस्त ठेवला जाणार आहे़
पोळा सणादिवशी गावागावात बैलजोड्यांच्या मिरवणुका निघतात़ यावेळी मानापानावरुन तसेच बैल पुढे, मागे घेण्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता असते़ पोळ्यादिवशी अनुचित प्रकार घडल्याची उदाहरणे आहेत़ त्यामुळे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी उपाययोजना केल्या आहेत़ स्थानिक पोलिसांच्या मदतीला मुख्यालयातील २५० पोलिस दिले जाणार आहेत़ यात ५० महिलांचाही समावेश आहे़ दंगलनियंत्रण पथकाच्या ६ तुकड्या तैनात राहणार आहेत़ शिवाय ५६० होमगार्डही बंदोबस्ताला राहतील़ ४६० पुरुष १०० महिला होमगार्डचा समावेश आहे़ सणाच्या अनुषंगाने राखीव पोलिसही सतर्क राहतील, असे जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक लक्ष्मण मंकावार यांनी सांगितले़
गडबड केल्याय गय नाही
सण शांततेत साजरा व्हावा, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे़ अधिकाऱ्यांना यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत़ पोळा सणात कोणी गडबड केली तर गय केली जाणार नाही, असा इशारा अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी दिला आहे़ संवेदनशील गावांमध्ये जादा बंदोबस्त राहील़ दंगल नियंत्रण पथके या गावांवर करडी नजर ठेवतील, असे रेड्डी म्हणाले़ (प्रतिनिधी)
पोळा सणात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या सुट्या रद्द केल्या आहेत़ आजारी वगळता इतर सर्व रजा रद्द असून पोलिसांना सतर्क तेच्या सूचना आहेत़ पोळ्यापाठोपाठ गणेशोत्सव, दुर्गोत्सव व त्यानंतर दिवाळी हे सण आहेत़ त्यामुळे पोलिसांचे शेड्यूल ‘बिझी’ बनले आहे़
येथे राहील जादा बंदोबस्त
जिल्ह्यातील काही संवेदनशील ठिकाणी जादा बंदोबस्त देण्यात आला आहे़ नेकनूर, माजलगाव ग्रामीण, आष्टी, शिरुर, धारुर, अंबाजोगाई ग्रामीण, परळी ग्रामीण, सिरसाळा, केज या ठाण्यांना जादा कुमक उपलब्ध करुन दिली आहे़