शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीचा गोडवा!; मराठीत मुख्यमंत्री, महापौरांना लिहिली हजारो पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 18:59 IST

उर्दू भाषेप्रमाणेच त्यांना मराठीचा गोडवा वाटावा म्हणून पत्रलेखनाचा उपक्रम.

ठळक मुद्देउर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीत लिहिणे, वाचणे सहसा अवघड जाते.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : मोबाईलच्या युगात शालेय विद्यार्थ्यांना आज पोस्टकार्ड काय आहे? हे माहीतच नाही. तीन दशकांपूर्वीपर्यंत पोस्ट विभागामार्फत पत्रव्यवहार करण्यात येत होता. या दुर्मिळ आठवणींना उजाळा देण्याचे काम रीड अ‍ॅण्ड लीड फाऊंडेशनने सुरू केले आहे. उर्दू भाषेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही मराठीचा गोडवा वाटावा म्हणून मराठीत मुख्यमंत्री, महापौर यांच्या नावाने विविध विषयांवर पत्र लिहून घेण्यात येत आहेत. बुधवारी मराठी भाषा दिनानिमित्त आणखी व्यापक प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मिर्झा अब्दुल खय्युम नदवी यांनी दिली.

जानेवारी २०१९ पासून रीड अ‍ॅण्ड लीड फाऊंडेशनने शहरातील उर्दू भाषेच्या विविध शाळांमध्ये शुद्ध मराठी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे संयोजकांकडून शहरातील सर्वच उर्दू भाषेच्या शाळांमध्ये मराठी पत्रलेखन स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने शहरातील ५७ उर्दू हायस्कूल, २५५ प्राथमिक शाळांमध्ये पत्रलेखन स्पर्धा घेण्यात येणार आहे. २५ हजार पोस्टकार्ड आतापर्यंत पोस्टाकडून घेण्यात आले आहेत. त्यातील १६ हजार विद्यार्थ्यांनी ते लिहून दिले आहेत. 

विद्यार्थ्यांना ‘माझ्या शहराला भेट दिलीच पाहिजे कारण...’, ‘माझ्या शहरातील चांगला माणूस’, ‘माझ्या शहरातील प्रेक्षणीय स्थळ’, ‘आमच्या शहरातील अडचणी’, ‘माझे आवडते पुस्तक’, असे विषय देण्यात आले होते. मराठी भाषा दिनानिमित्त जास्तीत जास्त पत्र विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेत लिहून घेण्यात येणार आहेत. या दिनाचे औैचित्य साधून विद्यार्थ्यांनी शाळेत फक्त मराठी भाषेतच संभाषण केले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नदवी यांनी नमूद केले. या उपक्रमाला ‘उड्डाण’ या संस्थेने सहकार्य केले आहे. 

उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीत लिहिणे, वाचणे सहसा अवघड जाते. अनेक शाळांमध्ये द्वितीय भाषा मराठी असते. शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलता येते, वाचता येते. अवघड विषय म्हणून अनेक विद्यार्थी मराठीकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे उर्दू भाषेप्रमाणेच त्यांना मराठीचा गोडवा वाटावा म्हणून पत्रलेखन सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिनSchoolशाळाPost Officeपोस्ट ऑफिस