शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापुरात भाविकांचा महापूर

By admin | Updated: October 9, 2014 00:37 IST

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी आश्विनी पौर्णिमेनिमित्ताने तुळजापुरात अक्षरश: भाविकांचा महापूर लोटला.

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी आश्विनी पौर्णिमेनिमित्ताने तुळजापुरात अक्षरश: भाविकांचा महापूर लोटला. दरम्यान, गुरुवारी महाप्रसाद आणि रात्रीच्या मानाच्या काठ्यासोबत छबिना मिरवणुकीनंतर नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. पौर्णिमेनिमित्त रात्री दीड वाजता चरणतीर्थ होऊन त्यानंतर देवीला पलंगावरून सिंहासनावर आरुढ करण्यात आले. यानंतर सरकारी आरती व पुजाऱ्यांच्या आरत्या, नैवेध आदी विधी पार पडले. या विधिनंतर विशेष महाभिषेक पार पडले. यावेळी महंत चिलोजीबुवा, तुकोजीबुवा, भोपी पुजारी मलबा दिनेश परमेश्वर, शशीकांत पाटील, सुधीर कदम, सचिन पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, व्यवस्थापन सुजित नरहरे, सेवेकरी, छत्रे, बब्रुवान पलंगे, अंबादास औटी, गौतम पवेकर, नारायण पलंगे, पालखीवाले अर्जून भगत, पलंगवाले बाबूराव अंबादास, राजेंद्र गोंधळी यांच्यासह आराधी, देवीभाविक, पुजारी, उपाध्ये उपस्थित होते. बुधवारी सकाळी दहा वाजता शिवलाड समाजाच्या मानाच्या काठ्यांचे आगमन बारालिंग येथे झाले. यावेळी नगराध्यक्षा जयश्री कंदले, विजय कंदले यांनी काठ्यांची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर काठ्या भोपे पुजारी सचिन प्रकाश पाटील यांच्या घरी सवाद्य मिरवणुकीद्वारे दोन दिवशीय मुक्कामासाठी दाखल झाल्या. याच काठ्याबरोबर बुधवार व गुरुवार या दोन दिवशी देवीचा छबिना निघणार आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसात दहा लाख भाविकांनी शहरात हजेरी लावली होती. दरम्यान, मंगळवारी रात्रीपासूनच तुळजापूर शहराला जोडणारे उस्मानाबाद, नळदुर्ग, लातूर आणि सोलापूर हे चारही रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. बुधवारी घाटशीळ परिसर, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, बसस्थानक परिसर, किसान चौकी, कमानवेस, महाद्वार परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पायी चालून पायांना जखमा झालेले भाविक चक्क मिळेल त्या जागेवर अगदी रस्त्यावर विश्रांती घेताना दिसून आले. या शिवाय ठिकठिकाणी हलगी व संबळाच्या निनादात आराध्यांची गाणी सुरूच होती. क्रांती चौकात संपूर्ण रस्ता जोगवा मागणाऱ्यांच्या गर्दीने खचाखच भरला होता. परड्यात मीठ, पीठ, दक्षिणा टाकून असंख्य भाविक नवस-सायास पूर्ण करताना दिसून आले. विशेष म्हणजे सकाळच्या वेळी देवीच्या अभिषेकासाठी आराधवाडीच्या वाहनतळापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तर वाढत्या गर्दीमुळे दर्शन मंडपातील सर्वच मजले भाविकांनी खचाखच भरले होते. महाद्वारातही प्रचंड गर्दी होती. तुळजा भवानी मातेचा जयघोष करीत भाविक मोठ्या संख्येने दाखल होत होते. (वार्ताहर)