शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सुनावणी

By admin | Updated: August 29, 2014 01:27 IST

नांदेड : चुकीच्या पद्धतीने वेतनश्रेणी निश्चित करून शासनाचे २ कोटी १५ लाख ७८ हजार ७०६ रुपयांचे नुकसान करणाऱ्या जिल्ह्यातील गट ब २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुरुवारी सुनावणी झाली़

नांदेड : चुकीच्या पद्धतीने वेतनश्रेणी निश्चित करून शासनाचे २ कोटी १५ लाख ७८ हजार ७०६ रुपयांचे नुकसान करणाऱ्या जिल्ह्यातील गट ब २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुरुवारी सुनावणी झाली़ जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने वेतननिश्चिती करून जादा वेतन देण्यात आले होते़ याबाबत औरंगाबादच्या वेतन पडताळणी पथकानेही वारंवार आक्षेप घेतले़ तसेच स्थानिक लेखा परीक्षकांनीही सन २०१०-११ च्या लेखा परीक्षणात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीचे वेतन दिले जात असल्याबाबत आक्षेप घेतले होते़ असे असतानाही तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही़ मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बी़ एम़ शिंदे यांनी या प्रकरणात वसुली करण्याचे आदेश दिले आहेत़ दरम्यान त्या २६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुरुवारी जिल्हा परिषदेत सुनावणी झाली़ ही सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यासमोर होणार होती़ मात्र ते आज नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ शिंदे यांनीच ही सुनावणी प्रक्रिया पूर्ण केली़ त्या प्रक्रियेत वेतन निश्चिती संदर्भाचा शासन निर्णय येणार असल्याचे सांगत आपल्याला दिलेली वेतनश्रेणी योग्य असल्याचा दावा केला़ मात्र शासन आदेश आल्याशिवाय सदर वेतनश्रेणी दिली जाणार नसल्याचे डॉ़ शिंदे यांनी सांगितले़ तसेच जादा प्रदान केलेले वेतन वसूल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)