शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

बोहल्यावरून ठाण्यात

By admin | Updated: October 26, 2015 00:04 IST

माजलगाव : लग्नघटिका समीप आली होती. वऱ्हाडी, सगेसोयरे जमले होते. मात्र, बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेवासह नातेवाईकांना ठाण्याची हवा खावी लागली.

माजलगाव : लग्नघटिका समीप आली होती. वऱ्हाडी, सगेसोयरे जमले होते. मात्र, बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेवासह नातेवाईकांना ठाण्याची हवा खावी लागली. लऊळ येथे रविवारी अल्पवयीन मुलीसोबत होणारा विवाह ग्रामसेवकाने रोखला. याप्रकरणी नवरदेवासह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल आहे.बाबासाहेब भद्रे व महानंदा भद्रे यांनी त्यांच्या मुलीचा विवाह सादोळा येथील नातेवाईकाच्या मुलासोबत ठरवला होता. रविवारचा मुहूर्त ठरला होता. नवरदेवही शनिवारीच हळदीसाठी दाखल झाला होता. मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या विवाहाची घाई आईवडिलांनी केली होती. याची तक्रार पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांना भ्रमणध्वनीवर कळाली. त्यानंतर ग्रामसेवक धनंजय करे यांना कळविण्यात आले. चौकशी केली असता दुपारी १२ वाजता साखरपुडा व दुपारी ४ वाजता विवाह लावणार असल्याचे करे यांना समजले. मुलीची जन्मतारीख ५ जून २००१ असल्याचे निष्पन्न झाले. करे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यास कळविले. नवरदेव-नवरीसह त्यांचे आई-वडील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नवरीचे वडील बाबासाहेब नागोराव भद्रे, आई महानंदा बाबासाहेब भद्रे, नवरदेवाचे वडील निवृत्ती रंगनाथ साळवे, आई रूक्मीनबाई निवृत्ती साळवे व नवरदेव जितेश निवृत्ती साळवे यांच्याविरूध्द बालविवाह प्रतिबंधक कायदा २०११ नुसार गुन्हा दाखल केला. नवरीची चौकशी करून सोडून दिले. तपास फौजदार सुरेश माळी हे करत आहेत. (वार्ताहर)