शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
PM मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट केले 'मेलोडी चॉकलेट्स'! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
3
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
4
घरगुती क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
5
Indian Railway आता Logo बदलणार, मंत्रालयाचा होकार; नवे काय पाहायला मिळेल, डिझाइन कसे असेल?
6
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
7
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
8
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
9
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
10
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
11
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
12
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
13
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
14
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
15
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
16
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
17
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
18
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
Daily Top 2Weekly Top 5

ही दोस्ती तुटायची नाय… तब्बल ४० वर्षांची साथ; मृत्यूनंतरही ते मैत्रीच्या मंदिरात सोबतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 07:31 IST

डाॅ. किशन धाबे हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रौढ शिक्षण व पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक होते तर माधवराव बोर्डे हे संत कबीर शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते...

संतोष हिरेमठ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या १५ किमी अंतरावर टाकळी कदीम (ता. गंगापूर) हे एक असे ठिकाण, जे आज अतूट मैत्रीचा संदेश देते. श्रद्धेचा प्रत्यय देणारे हे स्थळ आहे. या ठिकाणी दोन मित्रांच्या आठवणी जपण्यासाठी आणि नि:स्वार्थ मैत्रीचा संदेश देणारे आगळेवेगळे ‘मैत्रीचे मंदिर’ उभारण्यात आले आहे. मैत्रीचीही नाळ असू शकते याची प्रचिती येथे येते. दिवंगत डॉ. किशन सदाशिव धाबे आणि माधवराव बोर्डे या २ मित्रांचे हे मंदिर आहे. 

प्रेरणा मिळावी म्हणून उभारले मंदिर -
डाॅ. किशन धाबे हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रौढ शिक्षण व पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक होते तर माधवराव बोर्डे हे संत कबीर शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. 

दोघांचीही मैत्री आयुष्यभर इतकी घट्ट राहिली की, मृत्यूनंतरही या मंदिराच्या रूपाने दोघे एकत्र आहेत. संगमरवरी मंदिरात दोघांच्या मूर्ती विराजमान आहेत. नव्या पिढीला मैत्रीविषयी प्रेरणा मिळावी, याच भावनेतून डाॅ. हर्षल धाबे यांनी वडील डाॅ. किशन धाबे आणि माधवराव बोर्डे यांच्या मैत्रीचे मंदिर उभारले. 

मुलांमध्येही घट्ट मैत्री
धाबे आणि बोर्डे यांच्या मुलांमध्येही अगदी घट्ट मैत्री आहे. धाबे आणि बोर्डे यांचे मित्र नियमितपणे या मंदिराला भेट देऊन आठवणींना उजाळा देतात. 

दोघांचीही ४० वर्षे मैत्री होती.  दोघांनी गरिबीची जाणीव ठेवली व जनहित साधत, निःस्वार्थ जीवन व्यतीत केले. अनेक विद्यार्थ्यांना घडविले. ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर येथे येतात. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, याच भावनेने माझ्या शेतात मैत्रीचे मंदिर उभारले. 
डाॅ. हर्षल धाबे
 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरFriendship Dayफ्रेंडशिप डे