शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
4
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
5
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
6
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
7
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
8
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
9
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
10
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
11
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
12
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
13
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
14
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
15
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
16
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
17
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
18
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
19
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
20
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
Daily Top 2Weekly Top 5

जलसाठे तहानलेलेच !

By admin | Updated: September 12, 2014 00:26 IST

व्ही़ एस क़ुलकर्णी, उदगीर यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाचे तंत्र बिघडले आहे़ हाकेच्या अंतरावर धो-धो तर दुसरीकडे रिमझिम असे उदगीर तालुक्यात पावसाचे स्वरुप राहिले आहे़


व्ही़ एस क़ुलकर्णी, उदगीर
यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाचे तंत्र बिघडले आहे़ हाकेच्या अंतरावर धो-धो तर दुसरीकडे रिमझिम असे उदगीर तालुक्यात पावसाचे स्वरुप राहिले आहे़ निसर्गाच्या या ‘तिरक्या’ चालीने तालुक्यातील प्रकल्प अजूनही तहानलेलेच आहेत़
पूर्वा नक्षत्रात झालेला पाऊस तालुक्यातील वाढवणा व हेर मंडळातच अधिक झाला आहे़ उर्वरीत पाच मंडळात अल्प पर्जन्यमान झाले़ त्यामुळे या मंडळातील जलसाठे अजूनही तहानलेलेच आहेत़ पावसाळ्याच्या प्रारंभी झालेल्या किरकोळ पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ मात्र नंतर पाऊस गायब झाल्याने या भागातील शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली़ दरम्यान, १० सप्टेंबरपर्यंत उदगीर तालुक्यात केवळ ४२ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ त्यात उदगीर ३७६ मिमी, वाढवणा ४०९, हेर ५१३, देवर्जन ३५६, मोघा ३४२, नळगीर २१५ तर नागलगाव मंडळात ४८६ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे़ पूर्वा नक्षत्रातील पावसामुळे केवळ वाढवणा व हेर मंडळातील जलाशयेच भरली आहेत़ उर्वरीत ५ मंडळातील जलसाठे अद्यापी भरले नाहीत़ देवर्जन मंडळातील देवर्जन मध्यम प्रकल्पात केवळ ४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे़ प्रकल्प होऊन २७ वर्षे झाली़ परंतु या काळात केवळ तीनदाच प्रकल्प १०० टक्के भरला आहे़ शेजारच्याच अरसनाळ तलावात २़३६ टक्के इतकेच पाणी आहे़ उदगीर मंडळातील बनशेळकी तलावात ६० टक्के, पिंपरी तलावात २३ तर निडेबनच्या तलावात ६० टक्के पाणी साठले आहे़ नागलगाव मंडळातील नागलगाव तलावात ६०, गुरधाळमध्ये ४१ टक्के तसेच मोघा मंडळातील भोपणीत २८़२२ टक्के इतकाच जलसाठा आहे़
कमी पावसामुळे शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे़ साधारणत: आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये उडीद, मुगाच्या राशी होतात़ परंतु, यंदा हे पीकच राहिले नसल्याने राशी होऊ शकल्या नाहीत़ तसेच सोयाबीनच्या उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़
उदगीर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ८५० ते १००० मिमीदरम्यान आहे़ गतवर्षी १० सप्टेंबरपर्यंत उदगीर मंडळात ६७९, मिमी, वाढवणा ७००, हेर ७३७, देवर्जन ६७६, मोघा ६४४, नळगीर ६३८ तर नागलगाव मंडळात ६१४ मिलीमीटर इतका पाऊस झाला होता़ २०१२ सालच्या १० सप्टेंबरपर्यंत सरासरी ५४५ तर २०११ मध्ये सरासरी ७०५ मिलीमीटर पाऊस झाला होता़ २००९ ते २०१३ या कालावधीत उदगीर तालुक्यामध्ये सर्वात कमी पाऊस उदगीर, मोघा व देवर्जन मंडळातच झालेला आहे़ या आकडेवारीवरुन पावसाचा लहरीपणा लक्षात येतो़