शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकधारक झिजवताहेत ठाण्याचे उंबरठे

By admin | Updated: July 25, 2014 00:30 IST

जालना: चार वर्षांत तिप्पट रकमेच्या आमिषास बळी पडलेल्या केबीसीतील हजारो गुंतवणूकधारकांनी आता कंपनीच्या कार्यालयापाठोपाठ पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे.

जालना: चार वर्षांत तिप्पट रकमेच्या आमिषास बळी पडलेल्या केबीसीतील हजारो गुंतवणूकधारकांनी आता कंपनीच्या कार्यालयापाठोपाठ पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली आहे. केबीसी मल्टीट्रेड या कंपनीत या जिल्ह्यातील किमान चार ते पाच हजार व्यक्तींनी गुंतवणूक केली आहे. विशेषत: ग्रामीण भागातील गुंतवणूकधाकांची संख्या लक्षणीय आहे. जवळपास साडेतीन ते चार हजार ग्रामस्थांनी या तथाकथित कंपनीत गुंतवणूक केली असावी असा पोलिसांचा कयास आहे. घनसावंगी व अंबड या दोन तालुक्यात हे प्रमाण लक्षणीय आहे. घनसावंगी, अंबड तालुक्यातील गोंदी व परतूर तालुक्यातील आष्टी या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेकडो खेड्यांमधून एजंटांनी मोठा धुमाकूळ घातला होता. विशेषत: आकर्षक कमिशनचे आमिष दाखवून एजंट व पिग्मी कलेक्टरांच्या ताफ्यानिशी मोठ्या कुशलतेने कंपनीने योजनांचा प्रसार व प्रचार केला. जिल्ह्यात अन्यत्रही मोठ्या प्रमाणात एजंट नेमले. या सर्वांनी एकमेकांना विश्वास दाखवून चार वर्षांत तिप्पट रकमेचे आमिष दाखविले. अन्य योजनाही समोर केल्या. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर पाच हजारांपासून ते लाखापर्यंत गुंतवणूक करुन घेतली. दीड दोन महिन्यांपूर्वी पर्यंत या कंपनीने या गुंतवणूकधारकांना खिळवून ठेवले. एंजट व पिग्मी धारकांना जेव्हा व्यवहार कोलमडल्याचे लक्षात आले. तेंव्हा या दोघा घटकांनी काढता पाय घेतला. हळूहळू कार्यालये सुद्धा गुंडाळल्यानंतरच गुंतवणूकधारकांना आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.या जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागातील गुंतवणूकधारकांनी दीड दोन महिने या कंपनीचे उंबरठे झिजवून पैसे परत मिळावेत म्हणून प्रयत्न केले. परंतु त्यांना कोणीही दिलासा तर दिलाच नाही; उलट उर्मट उत्तरे दिली. त्यामुळे हबकून गेलेल्या गुंतवणूकधारकांनी वेगवेगळ्या दबावतंत्राचा वापर करीत स्वत:ची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. तोही निष्फळ ठरला. आता गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वदूर केबीसीने चुना लावल्याचे वृत्त कळाल्यापासून गुंतवणूकधार हळूहळू पोलिसांसमारे प्रकट होऊ लागले आहेत. आपलीही फसवणूक झाल्याच्या तक्रारी नोंदू लागल्या आहेत. या जिल्ह्यात आतापर्यंत ७५ तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यातील एकूण गुंतवणुकीची रक्कम २० कोटींच्या जवळपास आहे. तक्रारकर्त्यांची संख्या वाढेल असा अंदाज असून, या जिल्ह्यातून जवळपास ५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. परंतु या संदर्भात अगदी खुलेआमपणे कोणीही अद्यापही बोलावयास तयार नाही. मात्र ज्यांनी काबाडकष्ट करीत मोठ्या उमेदीने गुंतवणूक केली ते आता पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडत समोर येऊ लागले आहेत.पोलिसही हतबलजिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांच्याकडे काही नागरिकांनी थेट तक्रारी केल्या. पैसे मिळवून देण्याची विनवणी केली. पोलिस अधीक्षकांनी या सर्व तक्रारींची दखल घेण्याकरिता स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागास निर्देश दिले. या विभागाने आता ही सर्व प्रकरणे गोळा करुन नाशिकच्या पोलिस आयुक्तांकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिस साशंक आहेत. त्यामुळे ते गुंतवणूकधारकांना कोणतीही उत्तरे देईनासे असे झाले आहेत.(प्रतिनिधी)माध्यमांची कार्यालयात तक्रारीइलेक्ट्रॉनिक्स व प्रिंट मीडियाच्या कार्यालयांमधून दररोज किमान पाच व्यक्ती फसवणूक झाल्याच्या तक्रारी घेऊन दाखल होऊ लागले आहेत. आपण मोठ्या उमेदीने गुंतवणूक केली. व्याज घेतले. परंतु आता मुद्दलच मिळत नसल्याने करावे, काय असा सवाल करीत हे तक्रार करते डोळ्यात पाणी आणू लागले आहेत. आपल्या व्यथा मांडा, पैसे मिळवून द्या, अशी विनवणी करीत आहेत. घनसावंगी, गोंदी व आष्टी या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत फसवणूकधारकांची संख्या मोठी आहे. या तिन्ही ठाण्यांत सर्वाधिक म्हणजे ४५ गुन्हे दाखल झाले आहेत. आणखीनही तेवढेच गुन्हे दाखल होतील, असा अंदाज आहे. अन्यत्रही आता तक्रार करते पुढे येऊ लागले आहेत. साहेब तक्रार नोंदवा, गुन्हा दाखल करा, जप्ती करा अन् कुठल्याही परिस्थितीत पैसे मिळवून द्या अशी विनवणी करीत गोरगरीब शेतकरी, निराधार पोलिस ठाण्यात ठिय्या मांडून बसू लागले आहेत.