शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

देवीच्या मूर्तीवर चोरट्यांचा डल्ला

By admin | Updated: March 19, 2015 23:55 IST

पाटण येथील घटना : चांदीच्या मूर्तीसह, मुखवटे, मंगळसूत्र असा दीड लाखाचा ऐवज लंपास

पाटण : पाटणचे ग्रामदैवत लक्ष्मीदेवीच्या मंदिरात चोरट्यांनी डल्ला मारून देवीची चांदीच्या मूर्तीसह सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला. पोलीस ठाण्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील मंदिरात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.लक्ष्मीदेवीच्या मंदिरात रात्रीच्या वेळी घुसून चोरट्यांनी चांदीच्या मूर्तीसह देवीची मुखवटे, दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र चोरले. दरम्यान, या चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वानाने मोरे गल्लीपर्यंत माग काढला. मंदिर परिसरात ग्रामस्थांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, कॅमेरे सतत चालू नसतात.मंदिराचे पुजारी सागर गुरव (वय २७) हे मंदिराशेजारीच राहतात. त्यांनी पाटण पोलिसात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, गुरुवारी पहाटेच्या सुमारास लक्ष्मी मंदिरात चोरी झाल्याचे माझ्या लक्षात आले. चोरट्यांनी साडेतीन किलो वजनाची चांदीची मूर्ती तसेच इतर दोन चांदीचे मुखवट, भैरोबा देवाचा मुखवटा व देवीच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले आहे. (प्रतिनिधी)काही दिवसांपूर्वीच बसविलेली चांदीची मूर्तीलक्ष्मी मंदिर उंच माळावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ लोकवस्ती आहे. मात्र, मागील बाजूस मोकळा परिसर आहे. मंदिरात काही दिवसांपूर्वीच देवीच्या चांदीच्या मूर्ती बसविल्या होत्या. चोरट्यांनी लक्ष ठेवून गाभाऱ्याचा कडीकोयंडा ड्रील मशीनच्या साह्याने तोडून चोरी केली असल्याची चर्चा आहे.हे मंदिर उंच ठिकाणी आहे. मंदिराच्या सुरक्षेची पोलिसांची जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच ग्रामस्थांचीही आहे. या चोरीत परिसरातील कोणा व्यक्तीचा किंवा बाहेरच्या कोणत्या टोळीचा हात आहे का, याचा तपास करणार आहे. या चोरीचा लवकरच छडा लावू.- मितेश घट्टे, पोलीस उपअधीक्षकग्रामस्थांनी केला निषेधचोरांच्या नजरेतून आता देवही सुटले नाहीत. गावातील लक्ष्मीदेवीची चांदीची मूर्ती चोरीला गेल्याच्या घटनेचा पाटण ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला. तसेच पोलिसांनी या चोरीचा छडा लावून चोरट्यांना अटक करावी, अशी मागणीही करण्यात आली.