‘ते’ दागिने ठेवले होते पुरून

By Admin | Updated: January 19, 2015 00:57 IST2015-01-19T00:27:51+5:302015-01-19T00:57:43+5:30

परळी : तालुक्यातील दादाहरी वडगाव परिसरात एका भाजी विके्रत्या महिलेचा खून केल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलला आरोपी खाक्या दाखवताच बोलता झाला

They were kept in jewelry ornaments | ‘ते’ दागिने ठेवले होते पुरून

‘ते’ दागिने ठेवले होते पुरून


परळी : तालुक्यातील दादाहरी वडगाव परिसरात एका भाजी विके्रत्या महिलेचा खून केल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलला आरोपी खाक्या दाखवताच बोलता झाला. लुटलेले दागिने जमिनीत पुरून ठेवले होते, असे तपासात समोर आले. ते जप्त करण्यात आले आहेत.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका २४ वर्षीय युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मीनाबाई माणिक मुंडे (वय ५०) यांचा ७ जानेवारी रोजी सकाळी त्या भाजी व दूध विक्रीसाठी पुनर्वसित वसाहतीकडे चालल्या असताना आरोपीने त्यांच्या डोक्यात मोठे लाकूड घालून खून केला होता. त्यानंतर मीनाबाई यांच्या अंगावरील सोन्याची दागिने काढून नेले होते. हे दागिने त्याने मालेगाव येथे नेऊन पुरले होते. तपासाअंती मुंडे याच्याकडून मणी, मंगळसूत्र, कानातले काळ टोप, चांदीचे काकण आदी दागिणे जप्त केले. एपीय विश्वंभर पल्लेवाड, पो.ना. दत्ता उधाळे, महादेव तोफेवाड यांनी दागिने ताब्यात घेतले. (वार्ताहर)

Web Title: They were kept in jewelry ornaments