शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

शेड आहे, संरक्षक भिंतच नाही; अनेक ठिकाणी सुविधांची वाणवा

By admin | Updated: December 16, 2015 23:12 IST

हिंगोली : जिल्हाभरात अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा आहे. परंतु मागणी करूनही सोयी-सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत.

हिंगोली : जिल्हाभरात अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा आहे. परंतु मागणी करूनही सोयी-सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत. करंजीत सुविधांचा अभाव करंजी : वसमत तालुक्यातील करंजी येथे हिंदू व मुस्लिम बांधवासाठी दोन स्वतंत्र स्मशानभूमी आहेत. मात्र दोन्ही स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. सध्या स्मशानभूमीला संरक्षक भिंत नसल्यामुळे याठिकाणी रात्रीच्या वेळी प्राणी आपले निवारा करून राहत आहेत. पावसाळ्यामध्ये एखादा ग्रामस्थ मरण पावला तर दहन विधीसाठी साधे टिनपत्रेसुद्धा नाहीत. अनेकवेळा स्मशानभूमीला संरक्षक भिंतीची मागणी करूनही अद्याप काम झाले नाही. करंजी परिसरातील इतर गावांमध्येही स्मशानभूमीत मुलभूत सोयीसुविधांची समस्या आहे. कडोळीत एकच जागा कडोळी : येथे एकच स्मशानभूमी शेड असून २००३-२००४ मध्ये बांधकाम पूर्ण झाले आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे झाल्यास खाली करावे लागते. कारण त्यामधील सर्व बेड उखडले आहे. शेडची कुठल्याही प्रकारे दुरूस्ती झालेली नाही. गावात ५ हजार लोकसंख्या अजून दोन स्मशानभूमी आवश्यक आहेत. एकाच दिवशी जर दोन मृत्यू झाले तर एकाच शेडखाली अंत्यसंस्कार करावे लागतात. तेथे जाण्यास रस्ताही नसून विजेची व्यवस्था ग्रा.पं.करणार आहे. पावसाळ्यात अडचणी वाढतात. साटंब्यात अडचण भांडेगाव : भांडेगाव येथे स्मशानभूमीची मोठी अडचण होती. परंतु आता येथे स्वच्छता करून स्मशानभूमीची अडचण दूर केली. तर साटंबा येथेही स्मशानभूमीला कुंपन केलेले आहे. या ठिकाणी शेड नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधीस अडचण येते. साटंबा येथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, मातंग अशा वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमीसाठी वेगळी व्यवस्था आहे. परंतु एकाही ठिकाणी पावसाळ्यात अंत्यविधी करण्यास सोय नाही. तोंडापुरात समस्यांचा विळखा वारंगाफाटा : तोंडापूर येथील तिन्ही स्मशानभूमी चहूबाजूने समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. एक स्मशानभूमी ही अर्धवट बांधलेली आहे. एक मुस्लिम व एक बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहेत. सदरील स्मशानभूमींना तारकुंपन व संरक्षक भिंत सोडली तर कुठल्याही प्रकारच्या आवश्यक सोयीसुविधा नाहीत. सुशोभिकरणासाठी शासनाकडून अद्याप अनुदान खर्च करण्यात आलेला नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. चिखलातून जाते वाट डोंगरकडा : गावाची लोकसंख्या दहा हजारावर असून सर्व जातीधर्माच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. पण गावातील एकाही स्मशानभूमीला शेड पक्का रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पावसाळ्यात तर अंत्यविधीला फार मोठी समस्या येते. बौद्ध स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. गावंडे व अडकिणे गल्लीच्या स्मशानभूमीला लोकसहभागातून निधी गोळा करून तारकुंपन करण्यात आलेले आहे. डोंगरकडा फाटा येथे एकच स्मशानभूमी असून शेड, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शिरडला सुविधा नाहीत शिरडशहापूर : येथे तीन स्मशानभूमी असून दोन समाजांसाठी मात्र कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. आहे त्या स्मशानभूमीतही कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. गावची स्मशानभूमी ही नदीपलीकडे आहे. जैन समाजाच्या स्मशानभूमीत नुसते शेड उभारलेले असून तारांचे कुंपन आहे. दलितवस्ती स्मशानभूमीत अर्धवट संरक्षक भिंतीचे काम आमदार फंडातून झाले आहे. गौडगल्लीच्या स्मशानभूमीची संरक्षक भिंत नुकतीच बांधली आहे. मराठा व लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागाच नसल्याने उघड्यावर अथवा शेतात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. सर्वच स्मशानभूमीला जाण्यास चांगला रस्ता नाही. साधे हातपंप, वीज व्यवस्था नसल्यामुळे रात्री अंधाराचा सामना करावा लागतो.