साजापूरजवळ नादुरुस्त ट्रकवर रिक्षा धडकून चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 06:15 PM2018-11-22T18:15:17+5:302018-11-22T19:14:55+5:30

वाळूज महानगर : नादुरुस्त ट्रकवर भरधाव रिक्षा धडकून झालेल्या अपघातात. रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावरील साजापूरजवळ घडली. जालिंदर वसंतराव पुजारी (रा.हर्सूल) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे.

There is a rickshaw on the faulty truck near Sajapur | साजापूरजवळ नादुरुस्त ट्रकवर रिक्षा धडकून चालकाचा मृत्यू

साजापूरजवळ नादुरुस्त ट्रकवर रिक्षा धडकून चालकाचा मृत्यू

googlenewsNext

वाळूज महानगर : नादुरुस्त ट्रकवर भरधाव रिक्षा धडकून झालेल्या अपघातात. रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावरील साजापूरजवळ घडली. जालिंदर वसंतराव पुजारी (रा.हर्सूल) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे.


मुंबई-नागपूर महामार्गावरुन येत असताना साजापूरच्या गिरजा पेट्रोल पंपालगत ट्रक (एम.एच.२०,डी..ई.८७८८) पंक्चर झाला. त्यामुळे चालक भरत काळे याने रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा करुन टायर पंक्चर काढण्यासाठी गेला. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास या मार्गावरुन लासूरकडून ए.एस.क्लबकडे भरधाव जाणाऱ्या रिक्षा (एम.एच.२०,ई.एफ.३५१३) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर धडकला. यात रिक्षाचालक जालिंदर वसंतराव भुजाडी (४५) हा गंभीर जखमी झाला.

दरम्यान, मार्गावरुन जाणाºया वाहनधारकांनी मदतीसाठी धावून आले. पेट्रोल पंपावरील कामगार निलेश घुगे व चेतन शिंदे यांनी १०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टर व चालकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. रुग्णवाहिकेचे डॉ. अमोल कोलते, चालक विजय बोडखे यांनी घटनास्थळ गाठत जालिंदर पुजारी यांना शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. दरम्यान, डॉ.अमोल कोलते यांनी पुजारी याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्यास शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून जालिंदर पुजारी यास मृत घोषित केले.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार रिक्षाचा वेग जास्त असल्यामुळे चालक पुजारी याचे नियंत्रण सुटुन रिक्षा ट्रकवर धडकला. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे फौजदार माणिक चौधरी, फौजदार गंभीरराव, पोहेकॉ.शेवगे यांनी घटनास्थळ गाठुन अपघाताची माहिती घेतली.


महामार्गावर पडले जिवघेणे खड्डे
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे आसेगाव चौफुलीपासून लासूरपर्यंत डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, ए.एस.क्लब पासून आसेगाव चौफुलीपर्यंत काम सुरु न केल्यामुळे जवळपास १० किलोमीटर अंतरावर वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.

Web Title: There is a rickshaw on the faulty truck near Sajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.