शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

९३० ग्रा.पं.चा जमाखर्च हिशेबच नाही

By admin | Updated: September 8, 2014 00:04 IST

रामेश्वर काकडे, नांदेड सप्टेंबर महिना उजाडला तरी अद्याप जिल्ह्यातील ९३० ग्रामपंचायतींनी आपल्या जमा-खर्चाचा डाटा प्रिया स्वॉफ्ट या अज्ञावलीमध्ये भरलाच नसल्याची माहिती समोर आली आहे.

रामेश्वर काकडे, नांदेडसप्टेंबर महिना उजाडला तरी अद्याप जिल्ह्यातील ९३० ग्रामपंचायतींनी आपल्या जमा-खर्चाचा डाटा प्रिया स्वॉफ्ट या अज्ञावलीमध्ये भरलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन आपण केलेल्या गैरव्यवहाराचा बिगूल फुटेल या भीतीने बहुतांश ग्रामपंचायतींनी ही माहिती दडविल्याची शक्यता आहे.जिल्ह्यात एकूण १३०९ ग्रामपंचायती असून या सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने महाआॅनलाईन जोडण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी स्वतंत्र संग्राम कक्षामार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती संगणकाद्वारे इंटरेनटने जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना गावातच सर्व प्रकारचे कागदपत्रे उपलब्ध होऊन त्यांचे काम सुकर होण्याचा उद्द्ेश आहे. परंतु बहुतांश ग्रामपंचायती तसेच ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे या कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे.एकूण १३०९ ग्रामपंचायतींपैकी इंटरनेटची सोय असलेल्या केवळ २५० ग्रामपंचायत स्तरावर महाआॅनलाईन जोडणी दिलेली आहे. यासाठी ८४२ आॅपरेटरची नेमणूक करण्यात आलेली आहे. एक हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीसाठी एक स्वतंत्र आॅपरेटर तर एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असेल तर तीन गावासांठी मिळून एका आॅपरेटरची नेमणूक केलेली आहे. पंचायत विभागामार्फत सर्वच ग्रामपंचायतींना संगणक पुरविण्यात आले परंतु जागेअभावी बहुतांश संगणक ग्रामसेवक किंवा सरपंचाच्या घरी ठेवण्यात आले आहेत.महाआॅनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या प्रिया स्वॉफ्ट या अज्ञावलीमध्ये गावाची मालमत्ता, अ‍ॅसेंट डिरेक्टरी, लोकल गव्हरमेंट डिरेक्टरी, एरिया प्रोफाईल,प्लान प्लस, सर्विस प्लस, अ‍ॅक्शन स्वॉफ्ट, सोशल अ‍ॅडिट, ट्रेनिंग आणि पंचायत पोर्टल तसेच एनआयसीच्या ११ अज्ञावली यात भरल्या जातात. याशिवाय ग्रामपंचायतीने जन्म-मृत्यू असे १ ते २७ नमूने संग्राममध्ये भरले जातात. तसेच नागरी सुविधेमध्ये जन्म-मृत्यू मालमत्तेप्रमाण १९ दाखले देता येतात.याव्यतिरिक्त अपना सीएससी स्वॉफ्टवेअरमधून पॅन कार्ड, शेतकरी असल्याची नोंद, रेल्वे आरक्षण, डिस टिव्ही रिचार्ज, बस तिकीट बुकींग, मोबाईल रिचार्ज इत्यादी सेवा ग्रामपंचायतींना देता येतात. सध्या जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींनी पुढाकार घेवून बँकेची सुविधा सुरु केली आहे. यात झीरो बॅलेंसवर खाते उघडणे, क्रेडीट डाटा यासारख्या सेवा उपलब्ध करण्यात येत आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे तसेच जागेअभावी व इंटरनेट जोडणीच नसल्यामुळे शेकडो गावे महाआॅनलाईन सेवेपासून मूकत आहेत. पंचायत समितीत कॅम्प लावून जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी आणि ८ अ चा उतारा हे प्रमाणपत्र देण्याचे काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाल्याचे संग्राम कक्षाच्या सूत्रांनी सांगितले.